Varun Dhawan : बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलिकडेच त्याचा ‘बॉर्डर २’ चित्रपट सुपरहिट झाला होता. यानंतर आता वरुण लवकरच हॉलीवूडमध्ये झळणार असल्याच्या चर्चा होत आहेत. ‘पिंकविला’च्या एका रिपोर्टनुसार, वरुण धवन निर्माता लॉरेन्स कासानॉफ यांच्या एका मोठ्या हॉलीवूड ॲक्शनपटात काम करण्याची शक्यता आहे. निर्माते लॉरेन्स कासानॉफ हे ‘मॉर्टल कॉम्बॅट’ या प्रसिद्ध फ्रँचायझीसाठी ओळखले जातात. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, वरुणला ऑफर झालेल्या या हॉलीवूड प्रोजेक्टची कथा ‘ब्रह्मांड’ या संकल्पनेवर आधारित आहे. (Varun Dhawan) Pune News : महिनाभरातच उतरले प्रेमाचे रंग.! पालकांच्या इच्छेविरूध्द केलेले लग्नातील वादावर संवादातून घटस्फोट माहितीनुसार, नुकतीच वरुणने निर्माता लॉरेन्स कासानॉफ यांच्याशी चर्चा केली असून दोघांमधील संवाद सकारात्मक राहिला आहे. परंतु वरुण किंवा त्याच्या टीमकडून अद्याप या हॉलीवूड प्रोजेक्टबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सर्व काही निश्चित झाल्यास वरूणच्या करियरला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. Varun Dhawan दुसरीकडे, वरूण धवनच्या आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाची देखील चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असून, याचे दिग्दर्शन वरुणचे वडील आणि दिग्गज दिग्दर्शक डेव्हिड धवन करत आहेत. या चित्रपटात वरुण धवनसोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. (Varun Dhawan) हेही वाचा : Pune News : महिनाभरातच उतरले प्रेमाचे रंग.! पालकांच्या इच्छेविरूध्द केलेले लग्नातील वादावर संवादातून घटस्फोट