Bhigwan Kidnapping Case : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एका २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, त्यानंतर समोर आलेल्या माहितीने अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला. संबंधित २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाले नव्हते तर तिने तिच्या इच्छेने निघून गेल्याचे सांगत एक व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यानंतर काल मध्यरात्री दीड वाजता तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली. तिने आपला जबाब नोंदिवला असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणीच्या घरच्यांच्या दाव्यानुसार, तरुणीची आई व भावाला बांबूने मारहाण केली आणि मिरचीपूड डोळ्यात टाकून तरुणीचे अपहरण केले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. आता याचा मेडिकल रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 17 फेब्रुवारी या दिवशी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली होती. ज्या मुलासोबत संबंधित तरुणी निघून होती. तिचे आणि तरुणाचे प्रेमसंबध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथक रवाना करण्यात आली होती. मात्र, काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. तरुणी प्रियकरासोबत कुठे कुठे गेली? मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर कुठे कुठे फिरले याची माहिती समोर आली आहे. श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. बारामती पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला. मुलीने जबाबात मी माझ्या मर्जीने गेले असल्याचे सांगितले. अपहरण होण्याच्या आधी नेमकं काय घडलं होतं? भिगवण अपहरण प्रकरण सुरुवातीला समोर आले होते. पण त्याअगोदर नेमंक काय घडलं होतं याची माहिती समोर आली आहे. तरुणीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन केला आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावलं आणि तिथून ते निघून गेले. हेही वाचा : Jiah Khan Birth Anniversary: 10 मिनिटांची भेट आणि मिळाली ‘निशब्द’; अमिताभ बच्चनसोबत रोमँस करून झळकली जिया खान