NEET परीक्षेत 99.99 टक्के गुण तरीही विद्यार्थाने उचललं टोकचं पाऊल; कारण ऐकून व्हाल थक्क..

Chandrapur News | चंद्रपुर जिल्ह्यातील एका तरुणाने NEET परीक्षेत मोठे यश मिळवले होते. मात्र तरीही त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनुराग बोरकर (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नावे आहे. अनुरागने नीट परीक्षेत चांगलं यश मिळवलं होतं. मात्र, त्याने टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न अनेकांकडून केला जात आहे. याबाबत माहिती समोर आली असून अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
अनुराग अनिल बोरकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने NEET UG 2025 परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1475 वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला होता.
यासाठी त्याला 24 सप्टेंबरला एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतू त्यापूर्वी त्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याचे कारण म्हणजे त्याने सुसाइड नोटमध्ये ‘मला डॉक्टर व्हायचं नाही,’ असे सांगितलं आहे. त्याला डॉक्टर व्हायचे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे यामुळे उघड झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे ही घटना घडली आहे. Chandrapur News |
दरम्यान, अनुरागचा नंबर भारतातील सरकारी रुग्णालयात लागला होता. तर त्याचे काही मित्र परदेशात शिक्षणासाठी जाणार होते. अनुरागलाही परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं होतं. मात्र त्याला कुटुंबाकडून येथेच मेडिकल शिक्षण घेण्यास सांगितलं जात होतं. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीसांकडून केला जात आहे. परंतु या घटनेनंतर विद्यार्थांच्या मानसिक आरोग्याकडे आणि त्यांच्यावर लादले जाणारे पालकांचे निर्णय याकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. Chandrapur News |
हेही वाचा:





