Sharyu Sonawane : ‘…असा कुठल्याही मालिकेचा शेवट झाला नाही’; ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेनं सोडलं मौन
Sharyu Sonawane : 'पारू' मालिकेचा शेवटचा भाग काही तांत्रिक अडचणी आणि प्रॉडक्शनच्या समस्येमुळे प्रसारित झाला नाही.

Sharyu Sonawane : झी मराठी वरील ‘पारु’ ही मालिका कोणतीही कल्पना न देता, अचानक बंद झाल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. या मालिकेत पारूची मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री शरयू सोनावणे हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत या प्रकारावर भाष्य केले आहे.
टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असतानाही मालिका अचानक बंद होणे, हे शरयूसाठी देखील अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. याबाबत तिने प्रेक्षकांची माफीही मागितली आहे.
नेमकं काय म्हणाली शरयू सोनावणे? Sharyu Sonawane
“नमस्कार, मी शरयू सोनावणे.. म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर मी माझ्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडीओ करतेय. कारणच तसं आहे. गेल्या काही दिवसांपासून मला बरेच मेसेज आणि फोन कॉल्स येत आहेत. पारू ही मालिका अचानक का बंद झाली, असा प्रश्न मला विचारला जात आहे. Sharyu Sonawane
मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की, 10 फेब्रुवारी 2026 रोजी ‘पारू’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. तुमच्या प्रेमामुळेच, पाठिंब्यामुळेच आम्ही इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो.
सतत दोन वर्ष टीआरपी चांगला असूनही ही मालिका अचानक बंद होणं ही सर्वांसाठीच अनपेक्षित गोष्ट आहे आणि अर्थातच धक्कादायक गोष्ट आहे,” असं ती म्हणाली.
View this post on Instagram
तिने पुढे सांगितलं, “आमची ‘पारू’ ही मालिका अचानक बंद होतेय, याबद्दल निर्मात्यांनी आम्हाला कोणतीच पूर्वकल्पना दिली नव्हती. आजवर मराठी टीव्ही इंडस्ट्रीत असा कुठल्याही मालिकेचा शेवट झाला नाही, जसा पारू या मालिकेचा झाला. मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. Sharyu Sonawane
कारण या मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रॉडक्शनच्या समस्येमुळे हा शेवटचा भाग प्रसारित झाला नाही.
Ali Larijani Death: कोण होते अली लारीजानी? ; ज्यांच्या जाण्याने इराणला बसला मोठा धक्का , जाणून घ्या
आता पारू ही मालिका बंद झाली असली तरी आपल्यातलं नातं, तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्यासोबत असेल. पारूच्या सुखादु:खात तुम्ही माझ्यासोबत होतात, यासाठी मी कायम तुमची ऋणी असेन.”
“आता लवकरच एका नव्या रुपात, नव्या भूमिकेत भेटुयात. तोपर्यंत तुमचा आशीर्वाद आणि माझ्यावर असलेलं प्रेम कायम राहुद्या. मी तुमची मनापासून माफी मागते, तुमचीच पारू,” असं म्हणत शरयूने प्रेक्षकांची माफीही मागितली.




