Ganeshotsav 2022 : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले दर्शन
Updated On:

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपती बाप्पांचे दर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतले. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन यांनी फडणवीस यांचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी बालन यांच्याशी संवाद साधत दोन वर्षांच्या कालखंडानंतर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवाबाबत चर्चा केली.




