#MahaBudget2023 : आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मागितली आहे.
प्राथमिक माहितीनुसार सुमारे 13,729 हेक्टरवर नुकसान आहे. आणखी अहवाल येत आहेत. मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
(विधानसभा।दि. 8 मार्च2023)#unseasonalrains #Maharashtra #BudgetSession pic.twitter.com/jvcebzxLqC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 8, 2023
उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे 760 हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात 2685 हेक्टरचे नुकसान झाले आहे. धुळे येथे 3144 हेक्टर, नंदूरबार येथे 1576 हेक्टर, जळगाव येथे 214 हेक्टर, अहमदनगर येथे 4100 हेक्टर, बुलढाणा येथे 775 हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात 475 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/chief-minister-eknath-shinde-playing-dhulwad-while-farmers-are-suffering-losses-ajit-pawar/
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते.





