Devendra Fadnavis reply to Ajit Pawar – राज्यातील पालकमंत्र्यांची शनिवारी जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहेत. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. एक जिल्हा सांभाळताना नाकीनऊ यायचे, फडणवीस ६-६ जिल्हे कसे सांभाळणार, असे अजित पवार यांनी म्हंटले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून मी पूर्ण महाराष्ट्र सांभाळलाय 6 जिल्ह्यांचे काय घेऊन बसलात, असे म्हंटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. एक व्यक्ती सहा जिल्हे कसे सांभाळणार असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हांची जबाबदारी आहे. पुण्याच्या पालकमंत्री असताना माझ्या नाकीनऊ यायचे, फडणवीस एवढे जिल्हे कसे सांभाळणार असे अजित पवार म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देत मी संपूर्ण राज्य सांभाळलंय 6 जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, असे फडणवीस म्हणाले.