Ajit Pawar | मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सातत्याने नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणातील मुख्यसूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. ज्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यातच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हयाच्या दौऱ्यावर येणार आहेत. बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. पालकमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा बीडमध्ये येत असल्याने कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या या दौऱ्यावेळी पक्षाचे नेते असलेले धनंजय मुंडे देखील त्यांच्यासोबत असतील, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितलं आहे. बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक यावेळी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, भाजपा आमदार सुरेश धस, भाजपा आमदार नमिता मुंदडा, आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित हे लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. याशिवाय यावेळी बीडच्या यशवंतराव नाट्यगृह येथे युवकांचा संवाद आणि अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. Ajit Pawar | सुरेश धस यांचा आरोप दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही कमी होत नाहीत. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्यावर नवे आरोप केले आहेत. “माझ्यावर हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकिटं काढून बिश्नोई समाजाची काही लोकं आणली. याने हरणाचं मांस खाल्ल्याचे सांगून बिश्नोई समाजात मला व्हिलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यातून लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता,” असा आरोप नाव न घेता धस यांनी केला आहे. मुंडेंच्या निकटवर्तीयांनी जमिनी लाटल्याचा दमानियांचा आरोप तर धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांनी जमिनी लाटल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत त्यांच्या जमिनी लाटल्या. खोटे गुन्हे दाखल त्यांना जेरीस आणले. मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं जिवंत यांना मयत केलं आणि व्यवहार केल्याचा आरोप करत यांच्या मागे थेट धनंजय मुंडेंसारखे राजकारणी आहेत. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत. यांनी ११ शेतकऱ्याची फसवणूक केलीआहे. त्यांना छळून २० कोटींची जमीनीचा ८ लाखांत व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. हेही वाचा : Buldhana Accident : बुलढाण्यात विचित्र अपघात; 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी