पिंपरी: वेताळनगर येथील अनेक झोपडीवासिय घरांपासून वंचित 

झोपडीतील जिणंच वाट्याला 

दीपेश सुराणा/पिंपरी: वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात 960 कुटूंबियांना आत्तापर्यंत घरे मिळाली आहेत. येथे 1 हजार 440 घरे होणार होती. मात्र, प्रकल्प सीमित झाल्याने 432 घरे कमी झाली. पर्यायाने, बऱ्याच रहिवाशांना अद्यापही झोपड्यांमध्येच जीवन कंठावे लागत आहे. अपात्र लाभार्थ्यांना पात्र करून तसेच ज्यांना अद्याप घर मिळालेले नाही, त्यांना घर मिळणे आवश्‍यक आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.


कागदपत्रे असतानाही घर मिळत नाही. कुटूंबातील माणसांची संख्या वाढली आहे. तरीही अर्धा गुंठा जागेत असलेल्या झोपडीमध्येच राहावे लागत आहे. फोटोपास न मिळाल्याने घरंही मिळालेले नाही, अशा एक ना अनेक विविध अडचणी झोपडीवासियांनी “दै.प्रभात’शी बोलताना मांडल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.