पुणे जिल्हा | निघोजेतून पायी दिंडीचे प्रस्थान

चिंबळी, (वार्ताहर) – निघोजे (महानगाव) येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त जगदगुरू श्री सतं तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात निमित्त निघोजे ते पंढरपूर पहिल्यांदाच पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करून प्रस्थान करण्यात आले.
महानगाव निघोजे (ता. खेड) येथे श्रीनाथ महाराज प्रासादिक दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी (दि. 28) सकाळी 10 श्री भैरवनाथ महाराज मंदिरात हभप सुखदेव महाराज बिन्नर, संतोष महाराज काळोखे तसेच दिंडी प्रमुख, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव सर्व ग्रामस्थ तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,
पोलीस पाटील व आजी माजी पदाधिकार्यांसह वीणा पूजन व भजन करून करण्यात आले. यावेळी महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत भाविकांनी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन टाळ मृदंगाच्या भव्य गजरात ज्ञानोबा माऊलीचा जय घोषात फुलांची उधळण करीत गावाला प्रदक्षिणा घालून देहूकडे मार्गस्थ करण्यात आली.
दिंडी सोहळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ निघोजे, भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट व देवस्थान पंच कमिटी, ग्रामपंचायत महानगाव निघोजे व विविध कार्यकारी सहकारी संस्थां तसेच श्रीनाथ महाराज प्रासादिक दिंडी यांच्या वतीने करण्यात आले.





