Dehugaon : चिंचोलीतील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
Dehugaon : वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती ग्राहकांसह व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

देहूगाव : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील चिंचोली परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समस्त ग्रामस्थ चिंचोली यांच्या वतीने महावितरणच्या भोसरी विभागाच्या नावे निगडी येथील कार्यकारी अभियंता नितीन महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती ग्राहकांसह व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील विद्युत यंत्रणेची पाहणी करून जुन्या वीजवाहिन्या आवश्यकतेनुसार बदलण्यात याव्यात तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच ग्राहकांना दर महिन्याचे वीजबिल नियमित व वेळेवर मिळावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
महावितरण प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन चिंचोलीतील वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून बाळासाहेब जाधव राहुल गायकवाड संजय सावंत एड. प्रमोद दळवी, सरला गायकवाड सुरेखा तोरणे आदींच्या सॉफ्टवेअरचे नियोजन देण्यात आले.





