पुणे : ख्रिसमस, वर्षअखेरीमुळे फळांना मागणी आहे. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे मार्केट यार्डातील फळ बाजारात लिंबू, डाळिंब, खरबूज, पपई, सीताफळाच्या भावात वाढ झाली आहे. १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर थंडीमुळे उठाव नसल्यामुळे केवळ कलिंगडाच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील बाजारात रविवारी (दि. २२) फळबाजारात जुन्या आणि नवीन बहरातील मोसंबी ३० ते ४० टन, संत्री ७० ते ८० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ३० ते ४० टेम्पो, लिंबांची सुमारे एक ते दीड हजार गोणी, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिकू एक हजार बॉक्स, पेरू ६०० ते ७०० क्रेट, अननस ६ ट्रक, सीताफळ ८ ते १० टन, बोरांची ७०० गोणी एवढी आवक झाली होती.