अराजपत्रित पदे एमपीएससीमार्फत भरण्याची मागणी
Updated On:

पिंपरी – राज्यातील अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी, अशी मागणी आप युवा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
राज्य सरकारने महापोर्टल बंद करुन विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली. आता पुन्हा अशा प्रकारच्या एखाद्या खासगी कंपनीद्वारे चालविल्या जाणाऱ्या नवीन पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया न करता, एम.पी.एस.सी. द्वारेच ही भरती प्रक्रिया व्हावी, अशी मागणी आप युवा आघाडीने केली आहे.





