पुणे – आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे मासळीच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनला मागणी वाढली आहे. तरीही भाव स्थिर आहेत. त्याचबरोबर गावरान अंडी आणि मटणाचे भावही स्थिर आहेत. इंग्लिश अंडीच्या शेकडा भावात 15 रुपये वाढ झाल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.
गणेश पेठ बाजारात रविवारी (दि. 31) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 10 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो, तर नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 8 ते 10 टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : मोठे 1400, मध्यम : 1000, लहान 750-800, भिला : 550, हलवा : 480-550, सुरमई : 650-700, रावस : लहान 600, मोठा : कट 800, घोळ : 650, भिंग : 400, करली : 360, करंदी : सोललेली 480, पाला : लहान 750, मोठे : 1200, वाम : लहान 650-700, मोठी 900-1000, ओले बोंबील : 160- 220, कोळंबी : लहान 400, मध्यम 480, मोठे 400, जंबोप्रॉन्स : 1200-1400 किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1200, मोरी : 320-360, मांदेली : 120, राणीमासा : 200, खेकडे : लाल 200, चिंबोऱ्या : 500-600. खाडीची मासळी : सौंदाळे : 280, खापी : 240- 280, नगली : लहान 360, मोठी 650-700, तांबोशी : 440-480, पालू : 280, लेपा : लहान 160 मोठे 240, शेवटे : 280 बांगडा : लहान 220, मोठे 280, पेडवी : 100, बेळुंजी : 160 तिसऱ्या : 240, खुबे : 140, तारली : 160-180, नदीची मासळी : रहू : 160-180, कतला : 200, मरळ : 480, शिवडा : 280, खवली : 280, आम्ळी : 200, खेकडे : 240,वाम : 600. चिकन : चिकन : 160, लेगपीस : 200, जिवंत कोंबडी : 120, बोनलेस : 260. अंडी : गावरान : शेकडा : 720 डझन : 96 प्रति नग : 8, इंग्लिश : शेकडा : 445 डझन : 60 प्रतिनग : 5 मटण : बोकडाचे : 660 बोल्हाईचे : 660 खिमा : 660, कलेजी : 660.