देशाच्या राजधानीत ‘भीषण जलसंकट’; केजरीवालांनी मागितली मोदी सरकारला मदत

Delhi Water Crisis । उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भाग कमालीच्या उष्णतेने त्रस्त आहे. कमाल तापमानाचे वर्षानुवर्षे जुने विक्रम मोडीत निघाले आहे. गेल्या दोन दिवसात उष्माघाताने मृत्यू झाल्याचा घटनेत वाढ झाली आहे. अशातच देशाची राजधानी दिल्लीतील उष्णतेसोबतच पाण्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई असल्याचे दृश्य सध्या चर्चेत आहे.
दिल्लीतील अनेक भागात लोक बादल्या आणि पाईप घेऊन पाणी टँकरच्या मागे धावताना दिसतानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. पाण्याचा टँकर पाहताच लोक त्यावर उड्या मारतात आहे, पाणी टंचाईचे भीषण दृश्य दाखवणारे व्हिडिओ चांगलेच चर्चेत आहे. लोक लांबच लांब रांगेत उभे आहेत. हे संकट इतके मोठे आहे की, दिल्ली सरकारला गुरुवारी तातडीची बैठक बोलावावी लागली. याशिवाय पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर यापूर्वीच दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, न्यूज एजन्सी एएनआयने गीता कॉलनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये लोकांचा प्रचंड जमाव एका पाईपमधून पाणी भरण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
पाणीसंकटाबद्दल बोलताना या कॉलनीतील रहिवासी म्हणाले, ‘ही मोठी समस्या आहे. एक टँकर येतो आणि वस्ती खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या वस्तीत एकच टँकर काय करणार? शासनाकडे दोन वेळा अर्ज दिले मात्र गरिबांचे कोण ऐकणार. आम्ही पाणी विकत घेऊन पितोय आणि अनेक वेळा पाणी भरताना लोकांना दुखापत झाल्याचेही त्यांनी सांगितले.
#WATCH | Delhi: Due to the water crisis, people are facing problems in many areas of Delhi. Water is being supplied to the people through tankers.
(Visuals from Chanakyapuri’s Sanjay Camp area) pic.twitter.com/5HgqL7tj5O
— ANI (@ANI) May 31, 2024
Delhi Water Crisis । केजरीवाल यांनी भाजपकडे मागितली मदत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पाणीसंकटावर सांगितले की, ‘यावेळी संपूर्ण देशाला अभूतपूर्व उष्णतेने झोडपले असून त्यामुळे देशभरात पाणी आणि विजेचे संकट आहे. अशा कडक उन्हात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांनी ‘X’ वर लिहिले की, ‘दिल्लीला शेजारील राज्यांतून मिळणारे पाणीही कमी झाले आहे. म्हणजे मागणी खूप वाढली आणि पुरवठा कमी झाला. हे सर्वांनी मिळून सोडवायचे आहे. भाजपचे मित्र आमचा विरोध करत असल्याचे मला दिसत आहे. यामुळे प्रश्न सुटणार नाही.’ असेही त्यांनी लिहिले आहे.
केजरीवाल यांनी लिहिले की, ‘जर भाजपने हरियाणा आणि यूपीच्या सरकारांशी चर्चा केली आणि दिल्लीला महिनाभर पाणी दिले तर दिल्लीतील लोक भाजपच्या या पावलाचे खूप कौतुक करतील. एवढी प्रचंड उष्णता कोणाच्याही नियंत्रणाबाहेर आहे. मात्र आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेला दिलासा मिळू शकतो.’
#WATCH | Delhi: Due to the water crisis, people are facing problems in many areas of Delhi. Water is being supplied to the people through tankers.
(Visuals from Geeta colony area) pic.twitter.com/p1abxPRJbs
— ANI (@ANI) May 31, 2024
Delhi Water Crisis । पाण्याचा अपव्यय केल्यास दंड आकारण्यात येईल
यापूर्वी, दिल्लीतील पाण्याचे संकट पाहता, आप सरकारने निर्णय घेतला होता की जल बोर्डाने पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी 200 टीम तैनात केल्या आहेत. ही पथके सकाळी ८ वाजल्यापासून राजधानीच्या विविध भागात फिरतील आणि पाण्याची नासाडी करणाऱ्यांना 2000 रुपयांचे चलन बजावतील. तसेच अवैध पाणी कनेक्शन तोडण्यात येणार आहे. गाड्या धुवून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दिल्ली जल बोर्ड कारवाई करणार आहे. तसेच एखाद्याची पाण्याची टाकी ओसंडून वाहत असल्याचे आढळून आल्यास त्याचे चालान काढण्यात येईल. घरगुती पाणीपुरवठ्याचा वापर बांधकाम किंवा व्यावसायिक कारणांसाठी करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल.
Delhi Water Crisis । महाराष्ट्रातही पाणीटंचाई
पाणीसंकटाचा फटका फक्त दिल्लीवरच नाही तर इतर राज्येही त्याचा सामना करत आहे. महाराष्ट्रातही लोकांना पाण्यासाठी कडक उन्हात बाहेर पडावे लागते. महाराष्ट्रातील अमरावतीमधील मरियमपूर गावातील लोक भीषण पाणी संकटाचा सामना करत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की प्रदूषित तलावांच्या काठावर खड्डे खणून लोकांना पाणी प्यावे लागत आहे.





