दिल्ली स्फोटाचा थरकाप उडवणारा नवा व्हिडीओ अखेर समोर ; पहा त्या क्षणी नेमकं काय घडलं?

Delhi Red fort Blast। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 15 जण जखमी झाले होते. एका कारमध्ये असलेल्या स्फोटकांच्या साहाय्याने हा आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तपासयंत्रणांनी स्फोटाचे अनेक धागेदोरे शोधून काढले आहे. यामध्ये अनेक डॉक्टर्सचा समावेश आढळून आला आहे.
दिल्लीतील या स्फोटानंतर घटनास्थळावरील काळजाचा थरकाप उडवणारे अनेक फोटो समोर आले होते. त्यानंतर आता स्फोट झाला त्या क्षणाचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झाला. त्याअगोदर ज्या कारमध्ये स्फोटके होती, ती आय 20 कार 3 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. त्यानंतर 6 वाजून 23 मिनिटांनी ही कार पार्किंगमधून निघाली आणि 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट झाला होता. Delhi Red fort Blast।
Delhi: New CCTV footage surfaces of the car explosion near the Red Fort Metro Station
(Video: Delhi Police Sources) pic.twitter.com/3tVFk2UIKS
— IANS (@ians_india) November 12, 2025
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसत आहे. हा स्फोट झाला तेव्हा सर्व वाहने सिग्नलवर थांबली होती. सिग्नल सुटल्यानंतर वाहने पुढे सरकत असतानाच अचानक हा स्फोट झाला होता. स्फोट झाल्यानंतर प्रचंड मोठा आवाज आणि आगीचा मोठा लोळ उठला. त्यानंतर कारच्या बाजूला असणाऱ्या रिक्षा आणि इतर गाड्यांची वाताहात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांपैकी काहीजणांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. त्यांच्या शरीराचे तुकडे काही अंतरावर जाऊन पडले होते.
प्रजासत्ताक दिनाला स्फोटाचा कट आखला होता? Delhi Red fort Blast।
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी डॉ. मुजम्मिल आणि डॉ. उमर नबी या दोघांनी लाल किल्ला परिसराची रेकी होती. या सगळ्यांनी मिळून प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच स्फोटासाठी जी गाडी वापरण्यात आली होती, त्यामध्ये डॉ. मोहम्मद उमर हा होता. त्याने आत्मघाती हल्ला केला. डीएनए चाचणीत गाडीतील मृतदेह मोहम्मद उमर याचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.





