Sushil Kumar | सुशील कुमारच्या जामिनाला पोलीसांचा विरोध

नवी दिल्ली – छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या हाणामारीत युवा कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याच्या जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात विरोध केला आहे.
सुशील कुमारला जामिन दिला तर तो साक्षिदारांवर दबाव टाकेल. तसेच पुरावे संपवण्याचेही प्रयत्न करेल तसेच तो फरारही होऊ शकतो, असे सांगत पोलीसांनी आपला विरोध दर्शवला आहे. सुशीलच्या बीतीमुळे एका साक्षीदाराने न्यायालयात संरक्षणाची मागणी केली असल्याचेही पोलीसांनी निदर्शनास आणून दिले.
कुस्तीपटू सागरच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला सुशील कुमार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 24 एप्रिलला होणार आहे. यापूर्वी सत्र न्यायालयानेही सुशीलचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.





