Delhi News : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई ! पाक समर्थित दहशतवादी टोळीचा पर्दाफाश, 7 जणांना अटक
दिल्ली पोलिसांनी (Delhi News) दिल्ली-एनसीआर परिसरातून एक मोठी कारवाई करत पाकिस्तान समर्थित दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Delhi News : दिल्ली पोलिसांनी (Delhi News) दिल्ली-एनसीआर परिसरातून एक मोठी कारवाई करत पाकिस्तान समर्थित दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी पाकिस्तानमधील गँगस्टर आणि दहशतवादी शाहजाद भट्टी आणि अजमल गुजर यांच्या इशाऱ्यावर (Delhi News) काम करत होते. या हँडलर्सना पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना आयएसआयचा पाठिंबा असल्याचे तपासात समोर आले आहे.
हे मॉड्यूल पंजाबमधील सीमाभागात ड्रोनद्वारे पाकिस्तानमधून शस्त्रे, दारूगोळा आणि हेरॉईन सारखे अंमली पदार्थ मागवायचे आणि नंतर डेड-ड्रॉप पद्धतीचा वापर करून ते दिल्ली-एनसीआरमध्ये पोहोचवायचे.
आरोपींनी दिल्लीतील काही गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते पाकिस्तानी हँडलर्सना पाठवले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना पैशांचे आमिष दाखवून या टोळीत सामील केले जात होते.
आरोपींकडून ५ अत्याधुनिक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल आणि ४१ जिवंत काडतूस, ७ मोबाइल फोन (ज्यात पाकिस्तानी हँडलर्ससोबतचे चॅट्स आणि व्हॉईस नोट्स आहेत), १ एसयूव्ही कार आणि संशयास्पद बँक खात्यांचे तपशील आदी सामग्री जप्त करण्यात आली आहे.
मोहित उर्फ योगी, अनस त्यागी, दीपक अग्रोला, आरिफ, करणवीर सिंग, जतन आणि साबीर यांना अटक करण्यात आली असून या सर्वांवर आधीच खून, दरोडा आणि अंमली पदार्थ तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक चौकशीत हे आरोपी (Delhi News) सुरुवातीला बेकायदेशीर सावकारी करायचे आणि शस्त्रे खरेदी करण्याच्या नादात सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात आले. पोलीस सध्या या टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.






