Delhi New Cabinet: दिल्लीचे नवीन सरकार कसे आहे? सर्वात जास्त शिक्षित, तरुण कोण? किती मंत्री करोडपती? जाणून घ्या सर्वकाही

Delhi New Cabinet: देशाची राजधानी दिल्लीत आज शनिवारी (दि. 21) नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाने नेतृत्व बदलले आहे. केजरीवाल सरकारमध्ये शिक्षणमंत्री राहिलेल्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलीय. आतिशींसह अन्य पाच मंत्र्यांनी दिल्लीतील राज निवास येथे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत हे नव्या सरकारमध्ये मंत्री झाले आहेत.
#WATCH | AAP leader Atishi takes oath as Chief Minister of Delhi pic.twitter.com/R1iomGAaS9
— ANI (@ANI) September 21, 2024
चला जाणून घेऊया दिल्लीचे सरकार कसे आहे? त्याचे नवे चेहरे किती सुशिक्षित आहेत? कोणाचा कोणता व्यवसाय आहे?
कोण किती शिक्षित ?
मुख्यमंत्री आतिशी या मंत्रिमंडळातील सर्वात सुशिक्षित चेहरा आहेत. 2006 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमएससी केले. आतिशी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगितले आहे. याशिवाय अन्य दोन मंत्री गोपाल राय आणि कैलाश गेहलोत यांची शैक्षणिक पात्रताही पदव्युत्तर आहे. गोपाल राय यांनी त्यांच्या व्यवसायाचे वर्णन समाजसेवा असे केले आहे तर कैलाश गेहलोत यांनी राजकारण असे वर्णन केले आहे.
#WATCH | AAP leader Saurabh Bharadwaj takes oath as Minister in Atishi led Delhi govt. pic.twitter.com/E8U5LcEAJ8
— ANI (@ANI) September 21, 2024
सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसेन या दोन मंत्र्यांनी आपली शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक असल्याचे जाहीर केले आहे. सौरभ भारद्वाज, संगणक विज्ञानातील बी.टेक, व्यवसायाने सॉफ्टवेअर सल्लागार आहेत. इम्रान हुसैन यांनी बिझनेस स्टडीजमध्ये बॅचलरची पदवी घेतली आहे आणि त्यांचा पेशा राजकारण आहे. सरकारमधील नवा चेहरा मुकेश अहलावत हे 12वी पास असून ते व्यवसायिक आहे.
मंत्र्यांचे वय किती?
2020 च्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातून विजयी झालेल्या 43 वर्षीय मुख्यमंत्री आतिशी ह्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण आहेत. बल्लीमारन मतदारसंघाचे आमदार इम्रान हुसेन हे आतिशींपेक्षा अवघे 18 दिवस मोठे आहेत. 50 वर्षीय कैलाश गेहलोत हे या मंत्रिमंडळातील सर्वात वयस्कर आहेत. कैलाश गेहलोत हे नजफगडचे आमदार आहेत. याशिवाय अन्य तीन मंत्र्यांचे वय सौरभ भारद्वाज 44 वर्षे, मुकेश अहलावत 48 वर्षे आणि गोपाल राय 49 वर्षे आहे.
#WATCH | AAP leader Gopal Rai takes oath as Minister in CM Atishi led Delhi govt. pic.twitter.com/UEMtx3FRXZ
— ANI (@ANI) September 21, 2024
मंत्रिमंडळात श्रीमंत कोण?
मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संपत्तीच्या बाबतीत कैलाश गेहलोत आघाडीवर आहेत. 2020 च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात, कैलाश यांनी आपली एकूण संपत्ती 46.07 कोटी रुपये असल्याचे घोषित केले. या प्रकरणात दुसरे स्थान सुलतानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत यांचे आहे. मुकेश यांनी आपली संपत्ती 6.18 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. तिसऱ्या क्रमांकावर बल्लीमारनचे आमदार इम्रान हुसेन आहेत, ज्यांची 2020 मध्ये मालमत्ता 1.413 कोटी रुपये होती. मालमत्तेच्या बाबतीत मुख्यमंत्री आतिशी चौथ्या स्थानावर आहेत. 2020 मध्ये, अतिशी यांनी त्यांची एकूण संपत्ती 1.412 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते. पाचव्या क्रमांकावर ग्रेटर कैलासचे आमदार सौरभ भारद्वाज आहेत. 2020 मध्ये सौरभ यांची संपत्ती 1.09 कोटी रुपये होती. या मंत्रिमंडळात गोपाल राय यांची सर्वात कमी मालमत्ता आहे. 2020 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात बाबरपूरचे आमदार गोपाल राय यांनी त्यांची एकूण संपत्ती 90.01 लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते.
#WATCH | AAP leader Kailash Gahlot takes oath as Minister in CM Atishi led Delhi govt. pic.twitter.com/oCgGg03gHc
— ANI (@ANI) September 21, 2024
गुन्हा दाखल असलेले मंत्री ?
2020 च्या निवडणुकीच्या शपथपत्रात आतिशी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली होती. याशिवाय 2020 च्या प्रतिज्ञापत्रानुसार गोपाल राय यांच्यावरही गुन्हा दाखल होता. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, लखनौमधील हसनगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता.
#WATCH | AAP MLA Imran Hussain takes oath as Minister in CM Atishi led Delhi govt. pic.twitter.com/znewhBiNvM
— ANI (@ANI) September 21, 2024
2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता हाती घेतली. केजरीवाल यांच्यासोबत इम्रान हुसैन यांचाही शपथविधी झालेल्या सहा मंत्र्यांमध्ये समावेश होता. इम्रान हुसैन यांच्याकडे अन्न व पुरवठा, निवडणूक खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला होता.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सुलतानपुरी येथून विजयी झालेले मुकेश अहलावत हे दिल्ली मंत्रिमंडळातील नवा चेहरा आहेत. मुकेश अहलावत यांनी राजकुमार आनंद यांची मंत्रिमंडळात जागा घेतली. आनंद यांनी अबकारी धोरण घोटाळ्याच्या निषेधार्थ पदाचा राजीनामा दिला होता.





