दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चे काम पूर्ण; ‘या’ महिन्याच्या अखेरीस होणार सुरु

दिल्ली-एनसीआर : फरिदाबाद येथील बायपासवर निर्माणाधीन दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एक्स्प्रेस वेवर फक्त लोड टेस्टिंगचे काम बाकी आहे. रस्ता रुंदीकरण आणि चौकाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या महिन्याच्या अखेरीस एक्स्प्रेस वे वाहनधारकांसाठी खुला करण्यात येणार आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे सुरू झाल्यामुळे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांना फायदा होणार आहे.
फरिदाबादच्या लोकांना दिलासा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर फरिदाबादचे लोकही बल्लभगडच्या कैल गावातून मांडकौला मार्गे एक्सप्रेस वेवर पोहोचू लागले आहेत. कैल ते मांडकौला या एक्स्प्रेस वेचा लिंक रोड अद्याप अधिकृतपणे सुरू झाला नसला तरी येथून वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. या भागाची लांबी 25 किलोमीटर आहे.
एनएचएआयचे अधिकारी 20 फेब्रुवारीपासून या मार्गावर वाहतूक सुरू करण्याचा दावा करत होते, परंतु त्यापूर्वीच येथून मोठी आणि छोटी वाहने ये-जा करू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे ठिकठिकाणी उमेदवारांच्या रॅली आणि निवडणूक प्रचारामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
हा जाम टाळण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालून एक्स्प्रेस वेवरून प्रवास करत आहेत. सध्या अशोका एन्क्लेव्हपासून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी फलक आणि पथदिवे बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील एक्स्प्रेस वे बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आला आहे.





