सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ; बीआरएस नेत्या के कविता यांना अखेर जामीन मंजूर

Delhi Liquor Scam Case । बीआरएस नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत अखेर कविता यांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, कविता या 5 महिन्यांपासून कोठडीत आहे. साक्षीदारांची लांबलचक यादी आणि अनेक कागदपत्रे यामुळे कनिष्ठ न्यायालयात खटला चालण्यास वेळ लागणार आहे” असे म्हटले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, ते या प्रकरणातील तथ्यांमध्ये जात नाही.”
कविता 15 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात Delhi Liquor Scam Case ।
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांची मुलगी आणि बीआरएसची एमएलसी के कविता 15 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. उच्च न्यायालयाने 1 जुलै रोजी कविता यांची याचिका फेटाळली होती.
सुप्रीम कोर्ट ने आबकारी नीति मामले में BRS नेता के कविता को जमानत दे दी है। सुप्रीम कोर्ट ने दिल्ली हाईकोर्ट के उस आदेश को खारिज कर दिया जिसमें उनकी जमानत याचिका खारिज कर दी गई थी।
सुप्रीम कोर्ट ने प्रत्येक को 10 लाख रुपये का जमानत बांड भरने, गवाहों से छेड़छाड़ न करने और गवाहों… pic.twitter.com/6TZhsNskov
— ANI_HindiNews (@AHindinews) August 27, 2024
या अटींवर मिळाला जामीन Delhi Liquor Scam Case ।
सर्वोच्च न्यायालयाने के. कविता यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे जामीन जातमुचलक भरावे, साक्षीदारांशी छेडछाड करू नये आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, या अटीवर दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन देण्याचे निर्देश दिले आहेत.





