‘जणू कोणीतरी सासुरवाडीला…’, आप नेत्यांच्या तुरुंगवारीवरून ओवैसींचा निशाणा

Delhi Elections । दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग चांगलाच वाढवला आहे. सर्व पक्षांचे स्टार प्रचारक आपापल्या उमेदवारांसाठी मतांचे आवाहन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील आपल्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सतत पदयात्रा आणि जाहीर सभा घेत आहेत. यावेळी ओवैसी यांनी ओखला विधानसभा मतदारसंघातून एआयएमआयएम पक्षाचे उमेदवार शिफा उर रहमान यांच्यासाठी प्रचार केला. तेंव्हा त्यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधला.
प्रचारसभे दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी, “दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात का आहेत हे मला समजत नाही, त्यांच्यावर आयपीसी अंतर्गत गंभीर आरोप आहेत, त्यांच्यावर पीएमएलए देखील लावण्यात आला आहे, सिसोदिया यांच्यावर दारू घोटाळ्याचाही आरोप आहे , संजय जैन यांच्यावरही आरोप आहे. ओखला येथील सध्याच्या आप आमदारालाही तुरुंगात टाकण्यात आले आहे, ते तुरुंगात जातात आणि बाहेर येतात जणू काही ते त्यांच्या सासरच्या घरी गेले आहेत.”असे म्हणत ओवेसींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
ज्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता, आम्ही त्यांना राष्ट्रवादी म्हणू Delhi Elections ।
ओवैसी पुढे म्हणाले, “त्यांना न्याय मिळतो पण आमच्या एआयएमआयएम उमेदवार शिफा उर रहमानला न्याय मिळत नाही याचे कारण काय आहे? ते विचारत राहतात की आम्ही शिफाला तिकीट का दिले, मी त्यांना सांगू इच्छितो की जर पुन्हा निवडणुका झाल्या तर आम्ही शिफाला पुन्हा तिकीट देऊ. ज्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता, आम्ही त्यांना राष्ट्रवादी म्हणू, ज्यांना तुम्ही जातीयवादी म्हणता, आम्ही त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणू.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
#WATCH | #DelhiAssemblyElection2025 | AIMIM MP Asaduddin Owaisi says, “I am unable to understand that the Chief Minister of Delhi is in jail, he faces serious IPC charges, PMLA is also imposed on him, Sisodia is also accused of alcohol, Jain is also accused, the current MLA of… pic.twitter.com/GDp3z9Q3fh
— ANI (@ANI) January 29, 2025
शिफा उर रहमानला कोर्टाकडून कस्टडी पॅरोल
दरम्यान , दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा उर रहमानला करकडडूमा कोर्टाकडून कस्टडी पॅरोल मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना हा दिलासा मिळाला आहे. ते एआयएमआयएमच्या तिकिटावर ओखला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, शिफा उर रहमान ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत कस्टडी पॅरोलवर राहणार आहे.
ओखला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिफा उर रहमान यांनी निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत कोठडी पॅरोलची मागणी केली होती, जी सुनावणीनंतर करकरडूमा न्यायालयाने मंजूर केली. न्यायालयाने २ लाख रुपयांच्या सुरक्षा शुल्काच्या जमावणीवर शिफा उर रहमानला कस्टडी पॅरोल मंजूर केला आहे. दिल्ली दंगलीमुळे शिफा उर रहमानवर UAPA चा खटला दाखल करण्यात आला आहे, ती तिहार तुरुंगात आहे.
शाहीन बाग आणि ओखलामध्ये असदुद्दीन ओवैसींची रॅली Delhi Elections ।
याआधी असदुद्दीन ओवैसी यांनी शाहीन बाग आणि ओखला येथेही सभा घेतल्या होत्या. दिल्लीतील ओखला येथे आपल्या पक्षाचे उमेदवार शिफौ-उर-रहमान यांच्या प्रचारादरम्यान, ओवैसी यांनी केजरीवाल आणि भाजपवर जोरदार टीका केली होती की, जेव्हा ते ६ महिने तुरुंगात राहिल्यानंतर निवडणूक लढवू शकतात, तर त्यांचा उमेदवार का नाही?





