दिल्ली निवडणुकीच्या निकालापूर्वी मुख्यमंत्रीपदावर आतिशीचे मोठे विधान ; म्हणाल्या,”मला पूर्ण विश्वास…”

Delhi Election Result | दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या कालकाजी मतदारसंघातील उमेदवार आतिशी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी याविषयी “हा काम आणि गुंडगिरी यांच्यातील लढा आहे. ही चांगल्या आणि वाईटातील लढाई आहे” असल्याचे म्हटले आहे. कालकाजी आणि दिल्लीचे लोक चांगुलपणाच्या बाजूने उभे राहतील आणि आम आदमी पक्षाच्या पाठीशी उभे राहतील. अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आतिशी पुढे म्हणाल्या, “जर तुम्ही आम आदमी पक्षाचा इतिहास पाहिला तर कोणीही विचार केला नव्हता की आम्ही राजकारणात यशस्वी होऊ. देवाच्या आशीर्वादाने आम्ही येथे पोहोचलो आहोत, मला पूर्ण विश्वास आहे की दिल्लीचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. आतिशी म्हणाल्या की आम आदमी पक्षाचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होत आहे.”
मनीष सिसोदिया काय म्हणाले? Delhi Election Result |
मनीष सिसोदिया म्हणाले की, निकालाच्या दिवशीची चिंता आपल्या सर्वांमध्ये आहे. दिल्लीत शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या बाबतीत झालेल्या कामांमुळे आम आदमी पक्ष पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. एसीबीला मिळालेल्या माहितीचा वापर करण्यात आला नाही आणि आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे.
दिल्लीत आप स्वबळावर सरकार स्थापन करत आहे Delhi Election Result |
तत्पूर्वी, आम आदमी पक्षाचे ग्रेटर कैलाशचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी एक मोठे विधान केले होते की आम्ही काँग्रेससोबत कोणतीही युती करणार नाही. आम आदमी पक्ष दिल्लीत स्वबळावर सरकार स्थापन करत आहे.





