Delhi Election Result: दिल्ली निवडणुकीच्या निकालापूर्वीच मोठे राजकीय नाट्य; अरविंद केजरीवालांच्या घरी पोहोचले ACB पथक

Delhi Election Result: दिल्ली निवडणुकीच्या निकालापूर्वीच मोठे राजकीय नाट्य सुरू झाले आहे. एसीबीचे पथक आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि आप नेते संजय सिंह यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने आरोप केला आहे की, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना भाजपने 15 कोटी रुपयांची ऑफर दिल्या आहेत. आता या प्रकरणी एलजी व्हीके सक्सेना यांनी तपासाचे आदेश दिले असून तपास यंत्रणा या दोन्ही आप नेत्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत.
हे 15 कोटींचे प्रकरण काय आहे?
आप नेते मुकेश अहलावत यांनी सोशल मीडियावर एक नंबर जारी केला होता आणि दावा केला होता की त्यांना या फोन नंबरवरून सतत कॉल येत होते आणि त्यांना पैशांची ऑफर देखील देण्यात आली होती. त्या आरोपानंतरच आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निकालापूर्वी त्यांच्या निवासस्थानी मोठी बैठक बोलावली. त्या बैठकीत सर्व 70 उमेदवारांना बोलावण्यात आले होते, आता किती आले याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
कुछ एजेंसीज दिखा रही हैं कि गाली गलौज पार्टी की 55 से ज़्यादा सीट आ रही हैं।
पिछले दो घंटे में हमारे 16 उम्मीदवारों के पास फ़ोन आ गए हैं कि “आप” छोड़ के उनकी पार्टी में आ जाओ, मंत्री बना देंगे और हरेक को 15-15 करोड़ देंगे।
अगर इनकी पार्टी की 55 से ज़्यादा सीटें आ रहीं हैं तो…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 6, 2025
अरविंद केजरीवालांची पोस्ट –
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काही एजन्सी दाखवत आहेत की एका पक्षाला 55 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. गेल्या दोन तासांत आमच्या 16 उमेदवारांना ‘आप’ सोडून त्यांच्या पक्षात सामील होण्याचे फोन आले आहेत, ते त्यांना मंत्री बनवतील आणि प्रत्येकी 15 कोटी देतील. जर त्यांच्या पक्षाला 55 पेक्षा जास्त जागा मिळत असतील तर आमच्या उमेदवारांना फोन करण्याची काय गरज आहे?” दरम्यान, आपच्या या दाव्यानंतर आता चौकशीसाठी एसीबीचे पथक अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या निवासस्थानी पोहोचून चौकशी करत आहे.
भाजपने केजरीवालांकडे काय मागणी केली?
या संपूर्ण प्रकरणावर भाजप जोरदार आक्रमक दिसत आहे. केजरीवाल यांनी एकतर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईची तयारी ठेवावी, असे भाजपने म्हंटले आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षही या प्रकरणी झुकण्याच्या मनस्थितीत नाही. असं असलं तरी, जेव्हापासून एक्झिट पोलमध्ये भाजपचं सरकार स्थापन होत असल्याचं दिसून येत आहे, तेव्हापासून अनेक नेते नाराज आहेत.
एक्झिट पोल काय सांगत आहेत?
दिल्ली निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारीला येणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून तीन ते चार तासांत परिस्थिती स्पष्ट होईल, असे मानले जात आहे. सर्व एक्झिट पोल दाखवत आहेत की यावेळी भाजपची संख्या 45 पेक्षा जास्त असू शकते, तर आम आदमी पार्टीला केवळ 20 ते 25 जागांवर समाधान मानावे लागेल. मात्र उद्याच्या निकालावर सर्व काही स्पष्ट होईल. त्यामुळे त्या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अगर गाली गलौज पार्टी की 50 से ज़्यादा सीटें आ रही हैं, तो यह हमारे प्रत्याशियों को संपर्क कर के तोड़ने की कोशिश क्यों कर रहे हैं?
यह दिखा रहा है कि एक्ज़िट पोल एक साज़िश हैं आम आदमी पार्टी के विधायक तोड़ने की! https://t.co/3kKjiC4EQ4
— Atishi (@AtishiAAP) February 6, 2025





