Delhi Election 2025 : दिल्ली निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी !
Updated On:

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरून दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी अधिसूचना जारी केली. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला.
दिल्लीतील उमेदवार १७ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करू शकतील. त्या पुढील दिवशी म्हणजे १८ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवार २० जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतील. विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल.
त्यानंतर ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाईल. दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. देशाच्या राजधानीत आप, भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेथील निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.





