Delhi : दिल्लीकरांनी 50 दिवसांनंतर घेतला मोकळा श्वास; तब्बल 50 दिवसांनंतर एक्युआय मध्यम श्रेणीत

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता बुधवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंदवली गेली. यामुळे दिल्लीकरांनी तब्बल ५० दिवसांनंतर मोकळा श्वास घेतला आहे. दिल्लीत 24 तासांचा सरासरी वायु गुणवत्ता निर्देशांक म्हणजे एक्युआय दुपारी 4 वाजता 178 नोंदवला गेला, मंगळवारी 268 वरून सुधारणा नोंदवली.
भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी शहरात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स अपेक्षित असताना 7 डिसेंबरपर्यंत वारे वाहतील. ज्यामुळे 8 डिसेंबरपासून मध्यम धुके पडेल. यापूर्वी, 15 ऑक्टोबर रोजी 198 च्या रीडिंगसह मध्यम श्रेणीमध्ये नोंदवले गेले होते. शहरातील 38 हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केंद्रांपैकी केवळ श्री अरबिंदो मार्गावर बुधवारी अतिशय खराब श्रेणीतील हवेची गुणवत्ता नोंदवली.
दरम्यान, दिल्लीतील प्रदूषणाच्या स्रोतांचे मूल्यांकन आणि अंदाज घेण्यासाठी वापरले जाणारे प्राथमिक साधन, निर्णय समर्थन प्रणाली शुक्रवारपासून अद्यतनित केलेली नाही. तसेच शनिवारपर्यत हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत राहण्याची शक्यता आहे, परंतु रविवारी आणि सोमवारी ती ‘मध्यम’ श्रेणीत खराब होऊ शकते.
दिल्लीची हवा पुढील काही दिवस समाधानकारक श्रेणीत राहण्याची शक्यता आहे, असे दिल्लीसाठी एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीमने म्हटले आहे. दरमयान, स्वच्छ हवेसह, दिवसाचे तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त आहे. हवामान विभागाने गुरुवारी धुके राहण्याचा अंदाज वर्तवला असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २६ आणि १० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.





