Exit Poll: दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून कोणाला पहिली पसंती? पहा एक्झिट पोलचे आकडे

Delhi Assembly Elections CM Face Exit Poll: दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर सर्व एक्झिट पोल समोर आले आहेत. अनेक एक्झिट पोल जाहीर होत आहेत. यामध्ये संमिश्र कल दाखवण्यात आला आहे. बहुतांश पोलमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी आपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही काही पोलमध्ये केला गेला आहे. मात्र काॅंग्रेसला 0-3 पर्यंतच जागा दाखवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी जनतेची पहिली पसंती कोणाला आहे, असे वृत्तही समोर आले आहे. झी न्यूजनुसार, दिल्लीतील 50 टक्के लोक अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छित आहेत.
#AIExitPollOnZee : दिल्ली के लिए पसंदीदा CM कौन ?
▶️ अरविंद केजरीवाल: 50%
▶️ परवेश वर्मा: 30%
▶️ संदीप दीक्षित: 20%#ElectionsOnZEE #DelhiAssemblyElection2025 | @anuraagmuskaan @ShobhnaYadava pic.twitter.com/MU3jbgdfd8— Zee News (@ZeeNews) February 5, 2025
भाजपचे प्रवेश वर्मा यांना 30 टक्के तर काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना 20 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणात 46 टक्के मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना त्यांचा आवडता मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती.
त्याचवेळी भाजप खासदार मनोज तिवारी यांना केवळ 15 टक्के लोकांनी पसंती दिली. सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील 70 टक्के मतदारांना 2020 च्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे होते. आता हा आकडा बराच कमी झाला आहे. तो आता 50 टक्क्यांवर आला आहे.
पक्षांमध्ये या नावांवर चर्चा –
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध पक्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून अनेक नावे पुढे आली होती. आपमध्ये केजरीवाल आणि विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांची नावे पुढे आहेत. त्याचवेळी भाजपमध्ये खासदार बन्सुरी स्वराज आणि मनोज तिवारी यांच्या नावाचीही चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि नवी दिल्लीचे उमेदवार संदीप दीक्षित हेही या स्पर्धेत आहेत.





