Delhi Air Pollution : पूर्णपणे बंदी घाला.! राजधानी पुन्हा ‘वायू प्रदूषणा’च्या विळख्यात; नागरिकांना दिला इशारा
Updated On:

Delhi Air Pollution – वायू प्रदूषणात वाढ झाल्याने, शनिवारपासून दिल्ली-एनसीआरमध्ये श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा (GRAP) पहिला टप्पा लागू झाला आहे. केंद्रीय वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोग (CAQM) च्या उपसमितीने देखील लोकांना नागरिक सनद स्वीकारण्यास सांगितले आहे.
शनिवारी, दिल्लीचा एक्युआय २०९ नोंदवण्यात आला. ग्रेप-१ लागू झाल्यानंतर, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये कोळसा आणि लाकडाच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल. समितीने म्हटले आहे की, जोरदार वाऱ्यात उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषण वाढले आहे.
ग्रेप-१ उपायांतर्गत, जुन्या पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल वाहनांवर कडक देखरेख केली जाईल. कचराकुंडीतून घनकचरा, बांधकाम कचरा आणि धोकादायक कचरा नियमितपणे उचलण्याची खात्री करावी लागेल.





