Delhi : दिल्लीत २५ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटची आत्महत्या; फेसबुकवर लिहिली सुसाईड नोट

suicide | Delhi – दिल्लीतील बाराखंबा पोलीस स्टेशन परिसरात चार्टर्ड अकाउंटंट धीरज कंसल यांनी आत्महत्या केली. धीरज हा गुडगाव येथील एका कंपनीत काम करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर एक सुसाईड नोट लिहिली. त्याचे वय केवळ २५ वर्षे होते असे सांगितले जाते.
धीरजने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माझ्या मृत्यूवर कृपया दुःखी होऊ नका. माझ्यासाठी, मृत्यू हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहे. आत्महत्या करणे माझ्यासाठी वाईट नाही कारण माझ्यावर कोणाची जबाबदारी नव्हती. मी कोणाशीही जास्त जोडला गेलो नव्हतो आणि कोणीही माझ्याशी जोडले गेले नव्हते.
त्याने पुढे लिहिले की, म्हणून असे नाही की माझ्यामुळे कोणी नैराश्यात जाईल. मनोरंजक म्हणजे, बहुतेक लोकांना असे वाटणारही नाही की त्यांच्या आयुष्यात कसली उणीव निर्माण झाली आहे कारण मी कशाचाच भाग नव्हतो किंवा कोणाच्याही आयुष्यात नव्हतो.





