पुढील पाच दिवस देहूरोड परिसर लॉकडाऊन
Updated On:

पुणे – करोनाला आळा घालण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. दि.5 ते 9 जुलैदरम्यान हा लॉकडाऊन बोर्डाने जाहीर केला आहे.
देहूरोड येथील शेलारवाडी, चिंचोली, गांधीनगर या परिसरात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने पाच दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. या दिवसांत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असून, सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत दूध विक्री सुरू असेल. या व्यतिरिक्त अन्य दुकाने बंद राहणार आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. याशिवाय सध्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून घरोघरी आरोग्य तपासणी सुरू असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.





