Dehugaon : देहू नगराध्यक्षपदाची निवडणूक ११ सप्टेंबरला
Dehugaon: पूजा दिवटे यांच्या राजीनाम्यानंतर पद रिक्त

Dehugaon: – देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पूजा दिवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. ११) विशेष सभेत होणार आहे. याबाबतची माहिती कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम यांनी दिली.
देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. हवेलीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांची पुन्हा नगराध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अर्जांची छाननी होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता फेटाळलेल्या अर्जांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
९ ते ११ सप्टेंबरदरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज फेटाळल्याविरोधात अपील करता येणार आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
त्यानंतर दुपारी १.१५ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. अखेर दुपारी १.३० वाजता विशेष सभेत नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.
Pune District : बोगदा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा; आदिवासी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध





