महागाईचा हटके स्टाईलने निषेध; सिलेंडरवर पंतप्रधानांचा हसणारा फोटो लावून विरोध; video व्हायरल

नवी दिल्ली : सध्या देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच सिलेंडरच्या किमतीने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. याचाच विरोध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षांकडून नामी शक्कल लढवली आहे. तेलंगणामध्ये टीआरएसकडून पंतप्रधान मोदी यांचे हसतानाचे फोटो सिलेंडरवर लावले गेले आहेत. अशा प्रकारचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र रेशन दुकानांमध्ये लावले जावे अशी मागणी केली होती. याला टीआरएसने अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या ऑटोतील सिलेंडरवर पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावलेले दिसत आहेत. यावर ‘मोदीजी – – रु 1105’ असा संदेश असलेली पोस्टर्स पंतप्रधानांच्या हसतमुख प्रतिमेसह लावण्यात आली आहेत.
You wanted pictures of Modi ji ,
Here you are @nsitharaman ji …@KTRTRS @pbhushan1 @isai_ @ranvijaylive @SaketGokhale pic.twitter.com/lcE4NlsRp5— krishanKTRS (@krishanKTRS) September 3, 2022
टीआरएसचे सोशल मीडिया संयोजक कृशांक मन्ने यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यावर ‘सीतारामन जी, तुम्हाला मोदीजींचे फोटो हवे होते. हे घ्या फोटो’ असा संदेश लिहिण्यात आला आहे. कृशांकने यांनी केलेले हे ट्वीट बऱ्यापैकी व्हायरल झालं आहे. तेलंगणा सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील हे ट्वीट री ट्वीट केले आहे.
तेलंगणामधील काही विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये केसीआर यांच्यासह टीआरएसचे नेते सामान्यत: जनतेला महागाईची आठवण करुन देत आहेत. यामध्ये सामान्यांशी संबंधित मुद्द्यांवर जोर दिला जात आहे. सध्या गगणाला भिडलेल्या सिलेंडरच्या किमतीवरुन टीआरएस आक्रमक होत असल्याचं चित्र आहे.





