गुंतवणूकदारांशी पारदर्शक नाते डीफाईनएज

Updated On:
गुंतवणूकदारांशी पारदर्शक नाते डीफाईनएज

करोनानंतरच्या काळात भारतातील शेअर बाजाराची अनेक परिमाणे बदलून गेली आहेत. मागील दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांची आणि रोजच्या रोज व्यवहार करणाऱ्या ट्रेडर्सची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच सीडीएसएलकडे सात कोटींहून अधिक डीमॅट खात्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी बहुसंख्य खाती लॉकडाऊनच्या काळात उघडली गेली आहेत.

लॉकडाऊनच्या काळात नव्या उत्पन्नाची गरज, शोध आणि सोशल मीडिया, इंटरनेटद्वारे विविध माहिती उपलब्ध असणे यामुळे हे शक्‍य झाले. त्याचबरोबर ऑनलाईन आधार कार्ड आणि तंत्रज्ञानामुळे पैशाचे सहजपणे हस्तांतर करण्याची सुविधा निर्माण झाली या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेअर बाजाराकडे आकृष्ट होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. साहजिकच शेअर बाजारात सहभागी होणाऱ्यांची संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे पूर्वीचा शेअर बाजार आणि सध्याचा शेअर बाजार यात खूप मोठा फरक अनुभवयाला येतो आहे. आता तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे मोबाईल किंवा लॅपटॉपवरून सहजपणे पैसे हस्तांतरीत करता येतात.

सर्वसामान्यांचा वाढता सहभाग
या बदलांचा सगळ्यात मोठा दृश्‍य स्वरुपातील परिणाम म्हणजे प्रथमच परदेशी गुंतवणूक संस्थांनी पैसे काढून घेतले तरी शेअर बाजारात घसरण झाली नाही. अमेरिका आणि जगातील अन्य देशांमधील शेअर बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराची कामगिरी सरस ठरत आहे. जगभरात घसरण होत असताना भारतीय शेअर बाजार मात्र दमदारपणे वाटचाल करत आहे. हे घडू शकले ते भारतातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील सहभाग वाढल्यामुळे. असे उत्साहवर्धक चित्र असले तरी अनेकदा मोफतच्या लेबलखाली सोशल मिडियावर अनेक प्रकारची माहिती आणि सल्ले मिळत असतात. त्यातील खरे काय खोटे याची खातरजमा करण्याची क्षमता सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे नसते. त्यामुळे त्याची सहजपणे दिशाभूल होते.

कमाई कमी, तोटा जास्त
करोनानंतरच्या काळात ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटविषयी भरपूर तांत्रिक माहिती सोशल मिडियावर मिळू लागलेली आहे. असे सगळे असले तरी सातत्याने नफा कमावणारे ट्रेडर आणि गुंतवणूकदार फारसे दिसत नाहीत. काहीवेळा ते नफा कमावतात, काहीवेळा पैसा गमावतात. खरे तर कमाई कमी आणि गमावणे जास्त असेच चालू असते. असे का घडत असावे? कारण शेअर बाजार हा फक्त तुमच्या मोबाईलच्या किंवा डेस्कटॉपच्या स्क्रीनवर नसतो तर कोट्यावधी गुंतवणूकदारांची मने त्याठिकाणी कार्यरत असतात.

ऑप्शन्ससाठी उपयुक्त ऑप्स्ट्रा
अशा परिस्थितीत मोफत, दुप्पट नफा, कोट्यावधीची कमाई अशा घोषणांना भुलून न जाता गुंतवणूकदारांना योग्य आणि वास्तववादी माहिती आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी पुण्यातील डीफाईनएज कंपनी कार्यरत आहे. कंपनीकडे अनुभवी ट्रेडर, गुंतवणूदार आणि आयटी व्यावसायिक आहेत. त्यामुळेच डीफाईनएज त्यांच्या गुंतवणूकदार ग्राहकांसाठी वेगळ्या संकल्पनेवर काम करते. शेअर बाजारात इतरांप्रमाणे सरधोपट मार्ग स्वीकारू नका, कारण, आपण त्यांच्यामागे जात राहिलो तर आपण पुढे जाऊ शकणार नाही, या विचारांनी कंपनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन मार्गदर्शन करत राहते. त्यासाठी कंपनीने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आणि तक्त्‌यांवरून दिशा ठरवण्याच्या काही जुन्या पद्धतींचा अभ्यास करून नव्या गोष्टी विकसित केलेल्या आहेत. ऑप्शन व्यवहारातील व्यूहरचनेसाठी कंपनीने विकसित केलेले ऑप्स्ट्रा हे देशातील आघाडीचे सॉफ्टवेअर ठरले आहे. शेअर बाजाराच्या मूलभूत विश्‍लेषणावरही कंपनी काम करत आहे.

ट्रेडर घडवण्याचे कार्य
कंपनी शेअर बाजार, गुंतवणूक याविषयी लोकांना शिक्षित करण्याचे आणि बाजाराविषयी योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे काम करत आहे. त्यातूनच अनेक यशस्वी गुंतवणूकदार घडले आहेत. आजच्या घडीला कंपनीच्या माध्यमातून अनेकांनी शेअर बाजारात स्वतंत्रपणे ट्रेडिंग हाच व्यवसाय म्हणून निवडला आहे आणि अतिशय चाणाक्ष ट्रेडर म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित झालेली आहे.

दीर्घकालीन यशासाठी डीफाईनएज
डिफाईनएज गेली आठ वर्षे या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्याकडे येणारा गुंतवणूकदार कायमस्वरुपी त्यांच्याशी जोडला जातो असा अनुभव आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर कंपनी काम करत आलेली आहे. कंपनीने शेअर बाजारासंदर्भात विकसित केलेल्या अनेक वैशिष्ट्‌यपूर्ण तंत्रांचा वापर कसा करायचा हे गुंतवणूकदारांना शिकता यावे आणि त्याचा लाभ त्यांना मिळावा यासाठी कंपनीने डीमॅट खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. चांगले ट्रेडर घडवणे आणि यशोगाथा समाजासमोर आणणे हे कंपनीचे ध्येय आहे. त्यामुळेच कंपनीकडे डीमॅट खाते काढून त्यांच्या नवनवीन तंत्राच्या वापरातून आणि अनुभवी मार्गदर्शनातून शेअर बाजारातील यशाचा मार्ग अधिक प्रशस्त होईल.

आणखी संबंधित बातम्या

Stock Market : 'या' कारणांमुळे शेअर बाजारात फ्लॅट क्लोजिंग; गुंतवणूकदारांचे 96 हजार कोटींचे नुकसान

2026-08-21 17:01:43

Stock Market : 'या' कारणांमुळे शेअर बाजारात फ्लॅट क्लोजिंग; गुंतवणूकदारांचे 96 हजार कोटींचे नुकसान

Unemployment Rate : जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 5.1 टक्क्यांवर; ग्रामीण भागात घट, शहरी दर स्थिर

2026-08-17 22:23:19

Unemployment Rate : जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 5.1 टक्क्यांवर; ग्रामीण भागात घट, शहरी दर स्थिर

Wholesale Inflation : खाद्यपदार्थांच्या महागाईने चिंता वाढवली; जुलैमध्ये घाऊक महागाई 9.78% वर

2026-08-14 19:33:53

Wholesale Inflation : खाद्यपदार्थांच्या महागाईने चिंता वाढवली; जुलैमध्ये घाऊक महागाई 9.78% वर

Gold and Silver Price : सोनं आणि चांदीचेही दर वाढले; आजच्या किमती पाहा

2026-08-12 22:06:54

Gold and Silver Price : सोनं आणि चांदीचेही दर वाढले; आजच्या किमती पाहा

Polymer note : लवकरच बाजारात ₹10 आणि ₹20 रुपयांच्या पॉलीमर नोटा; सरकारची मंजुरी, छपाई सुरू

2026-08-11 16:53:34

Polymer note : लवकरच बाजारात ₹10 आणि ₹20 रुपयांच्या पॉलीमर नोटा; सरकारची मंजुरी, छपाई सुरू