Deepika Padukone : दीपिकाची ‘हॉलिवूड ऑफ फेमवर’ सन्मानावर मोहर; अमेरिकेच्या या स्ट्रीटवर स्टार आकारात कोरलं जाणार नाव

Actress Deepika Padukone : बॅालिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणची ओळख आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आता दीपिकाविषयी एक मान उंचवणारी बातमी समोर आली आहे. दीपिका पादुकोणने आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाची छाप सोडली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर या सन्मानावर तिने नाव कोरले आहे.
हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीची पोच पावती मिळविल्यानंतर दीपिकाने आपला मोर्चा हॅालिवूड इंडस्ट्रीकडे वळविला. ‘xXx: Return of Xander Cage’ या हॅालिवूड चित्रपटातून तिने हॅालिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. त्यानंतर तिने मेट गाला सारख्या कार्यक्रमानांही हजेरी लावली होती. याची दखल घेत तिला हॉलिवूडचा वॉक ऑफ फेम हा सन्मान देण्यात आला आहे.
हॉलिवूड वॉक ऑफ फेम म्हणजे काय तर ही अमेरिकेतील अशी एक जागा आहे. जिथे जगभरातील प्रसिद्ध कलाकारांची नावे स्टारच्या आकारात रस्त्यावर कोरली जातात. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड बुलेवर्ड आणि वाईन स्ट्रीटवर दीपिकाचे नाव कोरले जाणार आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर स्टार मिळाल्यानंतर प्रत्येक सेलिब्रिटीला त्याच्या देखभाल दुरस्तीसाठी दरवर्षी मोठी रक्कम भरावी लागते. त्यानुसार दीपिकालाही रक्कम द्यावी लागणार आहे. यासाठी दीपिकाला दरवर्षी देखभालीसाठी तब्बल ७३ लाख रुपये भरावे लागणार आहेत.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफविषयी दिली मोठी माहिती ; आज रात्रीपासून १०-१२ देशांना पाठवणार पत्रे





