Deepika Padukone Pregnancy । अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूडमधील सर्वाधिक आवडते कपल आहे. या जोडप्याची केमेस्ट्री नेहमीच ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांना आवडते. दीपवीर हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले तेव्हा पासून चाहते ते कधी गुड न्युज देणार यावरून सोशल मीडियावर चर्चा करत असतात.
View this post on Instagram
अशात पुन्हा एकदा दीपिका प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहे. नुकतीच दीपिका एका इव्हेंटमध्ये दिसली. त्यानंतर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. रणवीर आणि दीपिका गुड न्युज देणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, दीपिका प्रेग्नेंट असून लवकरच याबाबत ती सोशल मीडियावर अधिकृतपणे सांगणार आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, त्यांना दीपिका रणवीरच्या जवळच्या नातेवाईकांनी याबाबत सांगितले आहे.
View this post on Instagram
नुकतीच दीपिका एका इव्हेंटमध्ये दिसली. यावेळी तिचा बेबी बंप दिसल्याचीही चर्चा रंगली आहे. मात्र या बाबत रणवीर आणि दीपिकाने अधिकृतपने कुठलीही माहिती दिलेली नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनी या चर्चांवर आनंद व्यक्त केला आहे. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे.
दीपिका आणि रणवीर सिंग यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यानंतर 2018 मध्ये लग्न केले. दोघेही 10 वर्षांहून अधिक काळ एकत्र आहे. त्यांची पहिली भेट 2012 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ चित्रपटादरम्यान झाली होती, ज्यामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. दोघांची जोडी आणि केमिस्ट्री खूप आवडली होती.
रणवीर आणि दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फायटर’ चित्रपटात दिसली होती. रणवीर शेवटचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसला होता. यानंतर तो लवकरच ‘सिंघम 3’ आणि ‘डॉन 3’मध्ये दिसणार आहे. यासोबतच दीपिका प्रभास स्टारर कल्की 2898 AD मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती ‘सिंघम ३’ मध्येही दिसणार आहे.