‘दीपिका पादुकोण’चा बिकिनीवर जलवा; ‘या’ चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा.!

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे. तिच्या सौंदर्याची केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चा झाली आहे, ज्यामुळे तिचा जगातील टॉप 10 सुंदर महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. दीपिका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिने टॉप 10 सुंदर महिलांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर दीपिकाचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

दरम्यान, लवकरच दीपिकाचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यापूर्वीच सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. नुकतंच या चित्रपटातील अभिनेत्रीच एक गाणं प्रदर्शित झालं असून, यामध्ये दीपिकाचा बोल्ड आणि मादक अंदाज पाहायला मिळाला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पठाण चित्रपटामध्ये दीपिका एकदम बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना सुद्धा दीपिकाचा बिकिनी लूक देखील आवडलाय. दरम्यान, दीपिका पादुकोण हिने पहिल्यांदाच कुठल्या चित्रपटामध्ये बिकिनी घातली नसून यापूर्वी ही तिने एका हाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये बिकिनी घातली होती.

तर, काही महिन्यांपूर्वी शकुन बत्रा दिग्दर्शित रिलीज झालेला ‘गहराइयां’ या चित्रपटामध्येही दीपिकाने बिकिनी घातली होती. तसेच, या चित्रपटात अभिनेत्रीने प्रचंड बोल्ड सीन्स दिल्याचं देखील पाहायला मिळत होत. चित्रपटातील ‘डूबे’ या गाण्यात तिने सिद्धांतसोबत अनेक किसिंग सीन दिले असून, गाण्यात या दोघांची बोल्ड केमेस्ट्री दिसली होती.

आणखी संबंधित बातम्या

Govinda: गोविंदाने कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘बऱ्याच गोष्टी...’

Govinda: गोविंदाने कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘बऱ्याच गोष्टी...’

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

Bigg Boss : टीव्ही विश्वातील 'नागिन'ची 'बिग बॉस'च्या घरात जोरदार एन्ट्री; सलमानने सुद्धा केलं खास कौतुक, जाणून घ्या तिचा ग्लॅमरस प्रवास...

Bigg Boss : टीव्ही विश्वातील 'नागिन'ची 'बिग बॉस'च्या घरात जोरदार एन्ट्री; सलमानने सुद्धा केलं खास कौतुक, जाणून घ्या तिचा ग्लॅमरस प्रवास...