Deepika Padukone: दीपिका पदुकोण : “मी माझ्या लढाया शांतपणे आणि सन्मानाने लढते”

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पदुकोण अलीकडेच तिच्या “८ तासांच्या शिफ्ट” या विधानामुळे चर्चेत होती. या विषयावर बराच वाद निर्माण झाल्यानंतर अखेर दीपिकाने आपली चुप्पी तोडली आहे.
दीपिका काही काळापूर्वी संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ आणि प्रभासच्या ‘कल्की 2898 ए.डी.’ या सिक्वेलमधून बाहेर पडली होती. दरम्यान, ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ च्या निमित्ताने ती मध्य प्रदेशात गेली होती, जिथे तिच्या ‘लिव लव्ह लाफ’ या फाउंडेशनच्या १० वर्षांच्या कार्याचा उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान दीपिकाला विचारण्यात आले की, तिला कधी असं वाटलं का की योग्य गोष्टीसाठी उभं राहिल्याची किंमत चुकवावी लागते? यावर तिने शांतपणे उत्तर दिलं, “मी माझ्या लढाया नेहमी शांतपणे लढते. मी हे अनेक वेळा आणि विविध स्तरांवर अनुभवलं आहे. मोबदल्याच्या बाबतीतसुद्धा मला अनेक वेळा संघर्ष करावा लागला. कधी-कधी या गोष्टी सार्वजनिक होतात, पण तो माझा मार्ग नाही आणि मी अशा पद्धतीने वाढलेलीही नाही. मात्र, माझ्या लढाया मी शांतपणे आणि सन्मानाने लढणं पसंत करते.”
दीपिकाचं ‘लिव लव्ह लाफ’ फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहे. या कार्यक्रमात तिने आपल्या प्रवासाबद्दल आणि मानसिक आरोग्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मनमोकळं बोलली.
दीपिका पदुकोण आजही मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारी एक प्रभावी आणि संवेदनशील आवाज म्हणून ओळखली जाते.





