Deepika Kakkar : दीपिकाला कॅन्सरनंतर आणखी एका आजराचे निदान

Deepika Kakkar : अभिनेत्री दीपिका कक्करला ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. मागील काही महिन्यांपूर्वी लिव्हर कॅन्सरचे निदान झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. याबाबत तिच्या पतीने हेल्थ अपडेट देखील चाहत्यांसोबत शेअर केली होती.
मात्र हा आजार बरा होत नाहीच तोपर्यंत दीपिकाला आरोग्याची दुसरी एक समस्या जाणवू लागली आहे. याविषयी अपडेट खुद्द दीपिकानेच व्लॉगद्वारे चाहत्यांना दिली आहे.
दीपिकाला पोटात अचानक इतक्या तीव्र वेदना वेदना जाणवू लागल्याने रुग्णालयात तपासणीसाठी जावं लागलं. याबाबत शोएब आणि दीपिकाने रुग्णालयातूनच हा नवीन व्लॉग पोस्ट केला आहे. यामध्ये शोएबने सांगितलं की, ‘दोन दिवसांपासून दीपिकाच्या पोटात खूप दुखत होतं.
काल वेदना अधिक तीव्र झाल्यानंतर तिला डॉक्टरांकडे आणलं. सिटी स्कॅनमध्ये समजलं की दीपिकाच्या पोटात सिस्ट अर्थात गाठ झाले आहेत. या सिस्टची साइज 1.3 सेंटिमीटर आहे. मात्र सिस्टशिवाय तिचे इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते.
Madhuri Dixit and Shriram Nene: माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेचा जपानी लुक
दीपिकाला लिव्हर कॅन्सर झाल्यापासून एकच भीती असते की तिला पुन्हा कॅन्सर होऊ नये. डॉक्टरांनी पोटातील सिस्टवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणतीही मोठी शस्त्रक्रिया होणार नाही. छोट्याच्या प्रोसिजरने ते सिस्ट बर्न केले जातील. त्यासाठी दीपिकाला तीन ते चार दिवसांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागेल.
काल आम्ही व्लॉगमध्ये हसत होतो आणि आज आम्ही पुन्हा रुग्णालयात आहोत. हेच आयुष्य आहे. परंतु आम्ही अल्लाहचे आभार मानतो की सुरुवातीच्या स्टेजमध्येच आम्हाला सिस्टबद्दल समजले”, अशा शब्दांत शोएब व्यक्त झाला. यावेळी दीपिकासुद्धा खूप भावूक झाली होती. Deepika Kakkar :
हेही वाचा:






