दीपिका – कोल्डप्लेचा जुना फोटो व्हायरल

Bollywood News । ब्रिटीश रॉक बँड गायक कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची भारतात खूप चर्चा आहे. 18, 19 आणि 21 जानेवारीला मुंबईत या गायकांची मैफल रंगणार आहे. कॉन्सर्टची तिकिटे उघडताच विकली गेली. ऑनलाइन बुकिंग ॲप क्रॅश झाले. कोल्डप्लेच्या तिकीटांची ब्लॅकमध्ये लाखोंमध्ये विक्री होत आहे. भारतीय चाहत्यांवर कोल्डप्लेचा पार चढला आहे.
दरम्यान, दीपिका पदुकोणसोबतचा कोल्डप्लेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दीपिक आणि कोल्डप्ले एकत्र मस्ती करताना दिसत आहे. हा फोटो 2016 मधील असल्याचे म्हटले जात आहे. या फोटोमध्ये ती धूम्रपान करत असल्याचे म्हंटले जात आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
फोटोमध्ये दीपिकासोबत फ्रीडा पिंटोही दिसत आहे. या फोटोमध्ये दीपिकाच्या हातात सिगारेट दिसत आहे. सोशल मीडियावर यूजर्स या फोटोवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, दीपिका कोणती सिगारेट ओढत आहे? आणखी एका यूजरने लिहिले, दीपिकाच्या हातात सिगारेट आहे का? त्याचवेळी दीपिकाच्या हातात काहीतरी रिफ्लेक्शन असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
दीपिका पदुकोण सध्या मातृत्वाचा अनुभव घेत आहे. अभिनेत्रीने 8 सप्टेंबरला लेकीला जन्म दिला. अभिनेत्री सध्या तिच्या लेकीची काळजी घेण्यात आपला सर्व वेळ घालवत आहे. अभिनेत्री काही दिवसांपूर्वी पती आणि मुलीसोबत हॉस्पिटलबाहेर दिसला होती. रिपोर्टनुसार, अभिनेत्री मार्च महिन्यात तिच्या कामावर परतणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा सिंघम अगेन हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. अभिनेत्री शेवटची ‘कल्की एडी 2898’ मध्ये दिसली होती.






