कोथिंबीर, चाकवत, करडई, राजगिरा, चुका, चवळई, पालकच्या भावात घट

पुणे – मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने मार्केटयार्डात रविवारी कोथिंबीर, चाकवत, करडई, राजगिरा, चुका, चवळई, पालकच्या भावात घट आहे. तर, मेथी, शेपू, मुळे, हरभरागड्डीच्या भावात वाढ झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे कांदापात, पुदीना आणि अंबाडीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर अहेत.
रविवारी मार्केटयार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, मेथीची 80 हजार जुडीची, तर हरभऱ्याची 20 हजार गड्डींची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीच्या भावात घाऊक बाजारात 5 रुपये, करडई आणि चुक्याच्या गड्डीमागे प्रत्येकी तीन रुपये आणि चाकवत, राजगिरा, चवळई, आणि पालकच्या जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली. मुळ्याच्या भावात जुडीमागे 5 रुपयांनी, मेथी आणि शेपूच्या जुडीमागे प्रत्येकी दोन रुपये आणि हरभरा गड्डीच्या भावात एक रुपयांनी वाढ झाली.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी )
कोथिंबीर : 500 – 1000, मेथी : 400-800, शेपू : 400-800, कांदापात : 600-1000, चाकवत: 400-500, करडई : 300-400, पुदीना 200, अंबाडी 600-700, मुळे : 800-1200, राजगिरा: 300-500, चुका 400-500, चवळई : 400-500, पालक : 400-600, हरभरा गड्डी : 300-700.





