मोरोक्कोमध्ये 30 लाख कुत्र्यांना मारण्याच्या निर्णय; जान्हवी कपूर संतापली

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीत देखील दमदार अभिनय केला आहे. अल्पावधीत तिला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. जान्हवी कपूर ही एक प्राणीप्रेमी आहे. तिच्या घरी काही पाळीव कुत्रे (pets) आहेत. ती त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ नियमितपणे इंस्टाग्रामवर शेअर करत असते. जान्हवीला मोरोक्कोमध्ये 30 लाख कुत्र्यांना मारल्याची बातमी कळताच तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
एका रिपोर्टनुसार, मोरोक्कोमध्ये 30 लाखांहून अधिक कुत्र्यांना मारण्याची योजना आखण्यात आली आहे. हे 2030 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर यासंदर्भातील एक न्यूज रिपोर्ट शेअर करत या क्रूर निर्णयाचा निषेध केला आहे. Janhvi Kapoor |
तिनं लिहलं, “हे खरं असू शकत नाही. भटक्या प्राण्यांचे पुनर्वसन करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यांना ठार मारून जर स्वच्छता करता येत असेल, तर तो गुन्हा आहे”, असं म्हणत संताप व्यक्त केला. जान्हवीच्या या संवेदनशील आणि स्पष्ट भूमिकेचे अनेकांनी समर्थन केले आहे.
फिफा फुटबॉल विश्वचषक २०३० साली मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल देशांत खेळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मोरोक्कोने देशात स्वच्छतेचे अभियान राबविले आहे. मात्र यासाठी त्यांनी ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर जगभरातून टीका होऊ लागली आहे. प्रसिद्ध प्राइमेटोलॉजिस्ट आणि प्राणी हक्कांचे कार्यकर्ते वकिल जेन गुडॉल यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. त्यांनी याबाबत फिफाला पत्र लिहून या हत्या थांबवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
Janhvi Kapoor |
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘परम सुंदरी’ चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत मुख्यभूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा झळकणार आहे.
हेही वाचा :
Vegan Diet: व्हेगन डायट: आरोग्यासाठी वरदान की अतिरेक? जाणून घ्या फायदे आणि तोटे






