Paris Olympics 2024 : डेक्कन जिमखान्यात ऑलिम्पिक महोत्सव….

पुणे – पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा निमित्ताने अँथलेटिक्स प्रतिभेला चालना देण्याचा वारसा पुढे चालू ठेवत, डेक्कन जिमखाना क्लब दिनांक २६ जुलै ते १० ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक महोत्सवाचे आयोजन करणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ऑलिम्पिक चेतना साजरे करणे आणि युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य आणि खेळाबद्दलची आवड दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. सन १९२० मध्ये, सर दोराबजी टाटा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, डेक्कन जिमखाना क्लबने अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये पहिले भारतीय संघ पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, जे भारतीय क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
कार्यक्रमांमध्ये २६ जुलै रोजी सायंकाळी ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत आणि ऑलिंपिक बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर यांचा टॉक शो असणार आहे. त्यानंतर २७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. शिरीष मोरे यांचा ‘स्पोर्ट्स अ करिअर ऑप्शन’ या विषयावरील टॉक शोचा समावेश आहे. २८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ऑलिम्पियन मुरलीकांत पेटकर (चित्रपट: चंदू चॅम्पियन रिअल हिरो) टॉक शो आयोजित करण्यात आला आहे.

