अवघ्या १९ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण; नॅशनल क्रश ‘रश्मिका’ बनली बॅालीवूडची नवी क्वीन!

Rashmika Mandana Bollywood Entry | रश्मिका मंदाना आता हे नाव जवळपास सगळ्यांच्या तोंडातून सहज बाहेर पडत आहे. छावा सिनेमाच्या प्रदर्शानंतर तर रश्मिकाला सगळेच ओळखू लागले आहेत. छावामध्ये महाराणी येसबाईंची व्यक्तीरेखा रश्मिकाने साकरलेली होती. तिचा सिनेमातून लूक विशेष लक्षवेधी ठरला. अनेकांनी तिच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले, तर अनेकांनी तिच्याकडून मराठी जितकी हवी तितकी बोलणी गेली नसल्याने तिचा अभिनय फार काही प्रभाव पाडून गेला नसल्याचे म्हटले. असे असले तरी आता बॅालीवूडची नवी क्वीन रश्मिकाच बनली असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे. रश्मिकाची बॅालीवूडमध्ये एन्ट्री कशी झाली, तिला एवढं ग्लॅमर का मिळतयं, आगामी काळात तिच्याकडे कोणते प्रोजेक्टस आहेत, आदी गोष्टी जाणून घेणार आहोत.
1 रश्मिकाची बॅालीवडूमध्ये एन्ट्री
रश्मिकाने बॅालीवडूमध्ये एन्ट्री केली ती तिच्या मिशन मजनू या सिनेमातून. या सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर फारशी काही कमाई केली नाही. मात्र, रश्मिका मंदना हे नाव त्या सिनेमातून सर्वांसमोर आले. तरी देखील रश्मिकाचं म्हणावं तितकं वलय साऊथमध्ये असलं तरी येथे निर्माण होण्यास काही वेळ लागला. ती कसर भरून काढली. अॅनिमल सिनेमाने. या सिनेमातून रश्मिका मंदानाला हिंदी सिनेमात एक अढळ स्थान मिळवून दिली. याच सिनेमात नवोदित अभिनेत्री दिप्ती डिमरी हिच्या रणबीरसोबतच्या इंटीमेन्ट सीनची बरीच चर्चा झाली. अनेकांनी सिनेमाची तारीफ केली तर काहींनी सिनेमातील हिंसेवर आपले प्ररखड मतही मांडले होते. रणबीर आणि रश्मिकाच्या फ्रेश जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. खऱ्या अर्थाने अॅनिमल हा सिनेमा रश्मिकाच्या हिंदी सिनेमातील करिअरसाठी टर्मिंग पॅाईंट ठरला.
2 पुष्पामधून वेगळाच अंदाज
पुष्पा सिनेमा, भारतीय सिनेमासृष्टीतील एक मास्टरपीस! या सिनेमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या सिनेमाच्या दोन्ही भागांत अभिनेत्री रश्मिका मंदानाने अभिनय केला होता. सिनेमातील तिचं श्रीवल्ली हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. या सिनेमातील तिचा वेगळ्या नटखट अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली. हा सिनेमा जरी मूळ हिंदी सिनेमासृष्टीतील नसला तरी त्याची ओळख भारतीय सिनेमातील एक महत्वाचा सिनेमा म्हणूनच केला जातो. यामुळे हा सिनेमा देखील तिच्या फिल्मी करिअरमधला सर्वात्तम टर्मिंग पॅाईट ठरला असल्याचे सिनेमा इंडस्ट्रीतील जाणकार सांगतात.
3 सिनेमा इंडस्ट्रीत एन्ट्री कशी झाली?
रश्मिका हिला खरंतर मॅाडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं. तिच्या वडिलांचा बझनेस सांभाळायचा होता. मात्र, तिला एका सिनेमाची अॅाफर आली आणि तिचं करिअरचं पूर्ण बदललं. या बदललेल्या करिअरमुळेच रश्मिका मंदानाची ओळख साऱ्या देशाला झाली. तिचा पहिला सिनेमा करिट पार्टी हा २०१६ मध्ये रिलीज करण्यात झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमासाठी रश्मिकाला तब्बल दीड लाखांच पहिलं मानधन मिळाल होतं. या सिनेमात अभिनेत्यासोबत तिच्या रिलेशनशिपची बरीच चर्चाही झाली. यानंतर रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडासोबत गीता गोविंदामध्ये झळकली. या सिनेमामुळेच तिला टॅालीवूडमध्ये एक नाव मिळालं. यानंतर मग डिअर क्रामेड, भीष्मा आदी सिनेमात तिनं काम केलं. या सगळ्याच सिनेमांना चांगलं यश बॅाक्स अॅाफिसवर मिळालं असल्याची आकडेवारी सांगते.
4 भाईजानसोबत दिसणार मोठ्या पडद्यावर
मिशन मजनू आणि गुड बाय या सिनेमात रश्मिका दिसली होती. गुड बाय सिनेमात तर रश्मिकाने बॅालीवडूच्या महानायकासोबत काम केलं. आता तिने बॅालीवूडच्या भाईजानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. सिंकदर हा बहुचर्चित सिनेमा येत्या ईदला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या सिनेमात रश्मिकाची महत्वाची भूमिका आहे. यामुळे सोशल मीडियावर फक्त आणि फक्त रश्मिकाचीच चर्चा सुरू आहे. बॅालीवडूमधली करिना, दिपीका, आलियानंतर आता रश्मिकाचीच चर्चा होत आहे. तिचे आगामी अनेक प्रोजेक्ट्स अॅान फ्लोअर आहेत. यामुळे बॅालीवडूची नवी क्वीन रश्मिकाच बनली आहे.





