कर्जबुडवे जाहीर करू नये; डीएसके प्रकरणातील नोटीस
Updated On:

पुणे – गुंतवणूकदाराची फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांचा मुलगा शिरीष यांना सहेतूक कर्जबुडवे (वीलफूल डिफॉल्टर) जाहीर करण्याबाबत आलेल्या नोटीसवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
ती याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे जोपर्यंत याचिकेवर प्रत्यक्ष सुनावणी होऊन आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, तोपर्यंत त्यांना कर्जबुडवे जाहीर करू नये, अशी नोटीस बचाव पक्षाने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला बजावली आहे.
कुलकर्णी यांची बाजू ऐकून न घेता कर्जबुडवे जाहीर केल्यास रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाचे उल्लंघन होईल, असेही त्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
कर्जाची परतफेड केली नाही म्हणून तुम्हाला कर्जबुडवे का जाहीर करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बॅंकेने शिरीष कुलकर्णी यांना जानेवारी 2019 साली पाठवली होती.





