अज्ञाताकडून लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन गरोदर मुलीचा मृत्यू
Updated On:

पिंपरी – अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर 15 वर्षीय मुलगी गरोदर राहिली. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी जवळील माणगावात घडली.
याबाबत पिडित मयत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आटपाटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सदरचा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2020 ते मे 2021 या कालावधीमध्ये मुळशी तालुक्यातील माणगाव येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारानंतर ती मुलगी गरोदर राहिली. ती सात महिन्यांची गरोदर असताना १७ जुलै २०२१ रोजी त्या पिडित अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मूदळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.





