प्रिय कियारा..! रामचरण-उपासनाने पाठवले होममेड गिफ्ट; अभिनेत्रीने फोटो शेअर करत मानले आभार

Actress Kiara Advani : अभिनेत्री कियारा अडवाणी प्रेग्नंटअसून ती लवकरच आई बनवणार आहे. यामुळे तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागतासाठी उत्सुक आहे. अशातच साऊथ अभिनेता रामचरण आणि त्याच्या पत्नीने कियारासाठी एक खास होममेड गिफ्ट पाठवली आहे. हे गिफ्ट पाहून अभिनेत्रीने तिच्या इन्स्टावरून रामचरण आणि त्याच्या पत्नीचे आभार मानले आहे.
कियाराच्या गरोदरपणात राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी घरीचे बनवलेले आंब्याचे लोणचे तिला पाठवले होते. यासोबत दोघांनेही तिच्यावर प्रेम व्यक्त केले होते. या गिफ्टबरोबर उपासनाने एक चिठ्ठी लिहिली पाठवली होती. त्यात ‘प्रिय कियारा, माझ्या अथम्मा (सासूबाई) कडून, प्रेमाने बनवलेल्या आमच्या आंब्याच्या लोणच्याच्या खास चवीचा आस्वाद घे.’ कियाराने दोघाचे आभार व्यक्त करत इन्स्टावर स्टोरी शेअर केली आहे.
कियारा अडवाणीने इन्स्टा स्टोरीवर उपासनाची ही नोट शेअर केली असून, ‘माझ्या प्रियजनांचे खूप खूप आभार. असे म्हटले आहे. कियाराला हे घरगुती आंब्याचे लोणचे खूप आवडले आहे. कियारा अडवाणी ‘गेम चेंजर’ या चित्रपटात राम चरणसोबत दिसली होती.
लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन
राम चरणची आई सुरेखा कोनिडेला यांनी ‘अथम्माज किचन’ नावाचे स्वयंपाकाचे स्टार्टअप सुरू केले आहे. सुरेखा यांनी वयाच्या ६० व्या वर्षी हा व्यवसाय सुरू केला. याद्वारे त्या घरगुती पदार्थांना बनवत असतात. हा व्यवसाय कोनिडेला कुटुंबाच्या स्वयंपाकाच्या परंपरांपासून प्रेरित आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे लग्न २०२३ मध्ये झाले. लवकरच या जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
हेही वाचा: कन्नप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; अक्षय कुमार दिसणार महादेवाच्या रूपात





