Sharad Pawar : माजी मुख्यमंत्र्यावर प्राणघातक हल्ला, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाले…
Sharad Pawar : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर एका लग्न समारंभात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यात ते बजावले आहेत. त्यांना झेड सुरक्षा असतानाही हा हल्ल्यात झाल्याने विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्राथमिक चौकशीत आरोपीने “गेल्या २० वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होतो.” अशी थेट कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्याचे नाव कमल सिंग असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला तसेच उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित असलेल्या लग्नसमारंभात झालेला गोळीबार अत्यंत चिंताजनक आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला तसेच उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित असलेल्या लग्नसमारंभात झालेला गोळीबार अत्यंत चिंताजनक आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. तथापि, अशा प्रकारच्या घटना सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आणि धोकादायक ठरू…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 12, 2026
तथापि, अशा प्रकारच्या घटना सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आणि धोकादायक ठरू शकतात. सर्व मान्यवर सुरक्षित असल्याचे वृत्त ऐकून समाधान वाटते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सततच्या सुरक्षिततेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी एक्सवरुन हे ट्वीट केले आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी ११ मार्च या दिवशी फारूक अब्दुल्ला जम्मूमध्ये होते. त्यांच्या पक्षातील एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नासाठी ते बँक्वेट हॉलमध्ये आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हेही होते. या हल्ल्यातून दोघेही थोडक्यात बचावले आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत एक व्यक्ती फारूख अब्दुल्ला यांच्या अगदी जवळ जाताना दिसतो, आणि त्याच्या हातात पिस्तूलही दिसत आहे.
यानंतर लगेचच फारूख अब्दुल्ला यांचे सुरक्षा कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेले लोक हल्लेखोराला ताब्यात घेताना दिसत आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
धक्कादायक खुलासा
आपण मागील २० वर्षांपासून अब्दुला यांना मारण्याची वाट पाहत होतो, असा धक्कादायक खुलासा कमल सिंग याने केला आहे. पोलिस त्याच्याकडे अधिक तपास करत असून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लक्ष असणार आहे.





