Eknath Shinde Politics : शिंदेनी भाकरी फिरवली ! ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक (Eknath Shinde Politics) विस्ताराला मोठी गती मिळाली आहे.

Eknath Shinde Politics : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक (Eknath Shinde Politics) विस्ताराला मोठी गती मिळाली आहे. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील नाळेश्वर, राहटी आणि पिंपळगाव (कोरका) या भागांतील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय बंगल्यावर हा विशेष पक्षप्रवेश सोहळा (Eknath Shinde Politics) पार पडला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नवप्रविष्ट कार्यकर्त्यांचे पक्षात उत्साहात स्वागत करत त्यांना शिवसेनेचा भगवा ध्वज देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या अनेक स्थानिक नेत्यांनी या सोहळ्यात पक्षात प्रवेश केला. नाळेश्वर भागातून माजी जिल्हा परिषद सभापती नरहरी ठाकराम वाघ, माजी सरपंच रुपेश केशवराव वाघ, ग्रामपंचायत सदस्य बालाजी व्यंकटी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य बालाजी दत्ता भारती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे बळीराम उत्तम वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राहटी गावातून भोजराज वामनराव बोकारे, रावसाहेब नागोराव बोकारे, गोविंद पुंडलिक बोकारे, भागवत एकनाथ बोकारे, लक्ष्मण भानुदास बोकारे आणि रतन संभाजी बोकारे हे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले.
याशिवाय पिंपळगाव (कोरका) येथील नागेश व्यंकटराव बडवणे, जिल्हा परिषद सदस्य बाळगीर खुशालगिरी गिरी महाराज, दत्तरामजी गणेशराव बडवणे, बालाजीराव माधवराव डुकरे, रावसाहेब दत्तरामजी सूर्यवंशी आणि गोविंदराव रावण जाधव यांच्यासह असंख्य समर्थकांनी पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख रमाकांत मढवी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेत समन्वय साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवप्रविष्ट कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वावर आणि कार्यशैलीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, हे सर्व कार्यकर्ते विश्वासाने पक्षात आले असून आमदार बालाजी कल्याणकर स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तसेच कल्याणकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण स्वतः आणि संपूर्ण शिवसेना पक्ष ठामपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमदार कल्याणकर यांनी आपल्या मतदारसंघात सातत्याने मोठी विकासकामे केली आहेत, जनतेला न्याय दिला आणि लोकांचे प्रश्न प्रत्यक्ष सोडवले. म्हणूनच मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा निवडून (Eknath Shinde Politics) दिले आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर यांच्या कामाची प्रशंसा केली. या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत झाले आहे.






