DC Box Office : ‘डीसी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अवघ्या चार दिवसांत वसूल केले संपूर्ण बजेट
DC Box Office : परदेशातही 'डीसी'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने सोमवारी १.५० कोटी रुपयांची कमाई केली असून चार दिवसांची एकूण आंतरराष्ट्रीय कमाई १३.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

DC Box Office : दिग्दर्शक आणि अभिनेता लोकेश कनगराज आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डीसी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’सारख्या हॅालिवूड चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातला असून, यातही ‘डीसी’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अवघ्या चार दिवसांत मोठी कमाई करत चित्रपटाने संपूर्ण बजेट वसूल केले आहे.
चौथ्या दिवशी किती झाली कमाई?
‘डीसी’ने भारतात पहिल्या दिवशी ४.४४ कोटी रुपयांची कमाई करत दमदार सुरुवात केली. त्यानंतर पहिल्याच वीकेंडमध्ये चित्रपटाने २० कोटी रुपयांचा टप्पा पार केला.
सॅकनिलक आकडेवारीनुसार, ‘डीसी’ने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी देशभरातील ४,५२५ शोजमधून ५.७० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची भारतातील चार दिवसांची एकूण कमाई २६.६५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
जगभरात ४३ कोटींपेक्षा अधिक कमाई
परदेशातही ‘डीसी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने सोमवारी १.५० कोटी रुपयांची कमाई केली असून चार दिवसांची एकूण आंतरराष्ट्रीय कमाई १३.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. देशांतर्गत आणि परदेशातील कमाई एकत्र केल्यास, चित्रपटाने जगभरातील एकूण कमाई ४३.९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
चार दिवसांतच बजेट रिकव्हर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘डीसी’चा निर्मिती खर्च सुमारे २५ कोटी रुपये आहे. चित्रपटाने भारतातच २६.२५ कोटी रुपयांची कमाई करत हा खर्च वसूल केला आहे. सध्याची कमाईची गती पाहता हा चित्रपट लवकरच हिट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकेल.
कलाकार आणि कथा
‘कॅप्टन मिलर’ फेम दिग्दर्शक अरुण मथेश्वरन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात लोकेश कनगराज, वामिका गब्बी आणि संजना ए.के. यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ कादंबरीवर आधारित या चित्रपटात लोकेश कनगराज यांनी देवदासची भूमिका साकारली आहे. तर वामिका गब्बी आणि संजना ए.के. यांनी अनुक्रमे चंद्रा आणि पार्वतीच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाला संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले असून, यामुळे चित्रपटाच्या भावनिक आणि अॅक्शनप्रधान कथेला अधिक प्रभावी रूप मिळाले आहे.
Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; कार्यकर्ता जखमी





