David Warner Slams : ‘कर्णधाराने आमचा विश्वासघात केला…’; सँडपेपरगेट वादात डेव्हिड वॉर्नरचा पॅट कमिन्सवर थेट हल्लाबोल, पाहा VIDEO
David Warner Slams : पॅट कमिन्सने एका पत्रकार परिषदेत उस्मान ख्वाजाचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे सांगून फेटाळून लावले. यावर डेव्हिड वॉर्नरने प्रत्युत्तर देत म्हटले की, ख्वाजा खरे बोलला, पण कर्णधाराने आमचा विश्वासघात केला.

David Warner Slams Pat Cummins Supports Usman Khawaja Sandpapergate Book Controversy : २०१८ च्या कुप्रसिद्ध ‘सँडपेपरगेट’ बॉल टॅम्परिंग प्रकरणाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठा स्फोट घडवून आणला आहे. माजी सलामीवीर उस्मान ख्वाजाने आपल्या आत्मचरित्रात केपटाऊन कसोटीतील चेंडू छेडछाडीची कल्पना संपूर्ण संघाला आणि सपोर्ट स्टाफला होती, असा खळबळजनक दावा केला होता. ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कसोटी कर्णधार पॅट कमिंसने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ख्वाजाचे सर्व आरोप ‘पूर्णपणे बकवास’ असल्याचे म्हटले आहे; मात्र त्यानंतर माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने उघडपणे मैदानात उतरत कमिंसवर विश्वासघाताचा गंभीर आरोप केला आहे.
‘मी आजही उस्मान ख्वाजासोबत ठाम’; वॉर्नरचा कमिन्सवर निशाणा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड वनडे सामन्यादरम्यान ‘फॉक्स क्रिकेट’शी बोलताना डेव्हिड वॉर्नरने पॅट कमिन्सच्या पत्रकार परिषदेचा खरपूस समाचार घेतला. वॉर्नर म्हणाला, “पॅट कमिन्स आज सकाळी पूर्ण तयारीनिशी आला होता; परंतु मी आजही उजी (उस्मान ख्वाजा) आणि त्याच्या पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. त्याने जे लिहिले आहे, ते पूर्णपणे सत्य असून माझा त्याला पाठिंबा आहे. आज आमच्या कर्णधाराने खरोखरच आमचा विश्वासघात केला आहे आणि या गोष्टीमुळे मी अत्यंत निराश झालो आहे.”
कमिन्सने फेटाळले आरोप; म्हणाला, ‘ख्वाजा १०० टक्के खोटे बोलतोय’
David Warner has turned the blowtorch on Pat Cummins following Friday’s remarkable 70-minute press conference – saying his former captain threw Usman Khawaja ‘under the bus’.
MORE ▶️ https://t.co/bcbKIlcTbP https://t.co/DnotQy3dYD
— CODE Cricket (@codecricketau) November 13, 2026
तत्पूर्वी, शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत पॅट कमिन्सने ख्वाजाचे सर्व दावे फेटाळून लावले होते. “मैदानात सँडपेपर नेला जात आहे याची आम्हाला माहिती होती, असे जर उस्मान म्हणत असेल तर तो १०० टक्के चुकीचा आहे. मी आणि इतर गोलंदाज या कटाचे सूत्रधार होतो हा आरोप निव्वळ बकवास आहे. मी गेल्या आठ वर्षांपासून हेच सांगत आलो आहे की मला या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती,” असे कमिन्सने ठामपणे सांगितले.
बैनक्रॉफ्टला सावध राहण्याचा सल्ला दिल्यावरून कमिन्सने ख्वाजाला घेरले –
“…Complete and utter nonsense”
Australian Captain Pat Cummins sternly responds to allegations made by Usman Khawaja about Sandpaper Gate in 2018.
#Cricket https://t.co/58O130HRbC
— SEN Cricket (@SEN_Cricket) November 12, 2026
कमिन्सने पुढे ख्वाजाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “उस्मानने स्वतः कबूल केले आहे की त्याने कॅमरून बैनक्रॉफ्टला सँडपेपर वापरताना सावध राहण्यास सांगितले होते; हे ऐकून मला धक्का बसला. हा तो उस्मान नाही ज्याला मी ओळखतो. मित्र एकमेकांच्या आयुष्याशी आणि प्रतिष्ठेशी इतके बेजबाबदार वागत नाहीत,” अशा शब्दांत कमिन्सने आपली नाराजी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या प्रतिष्ठेला तडा; वाद आणखी चिघळण्याची चिन्हे
Pat Cummins fires back at former Australia team-mate Usman Khawaja over his sandpaper scandal 👀
He calls Khawaja’s claims “100% wrong” and “utter nonsense”… https://t.co/n1SJyjf6mc
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) November 13, 2026
२०१८ च्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नरला एक वर्षाची बंदी भोगावी लागली होती. आता वॉर्नरने थेट विद्यमान कर्णधार कमिन्सवरच विश्वासघाताचा आरोप केल्याने आजी-माजी खेळाडूंमधील ही दरी रुंदावली असून ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.





